Dogs Karnataka Government esakal
देश

Congress Government : कुत्र्याच्या हल्ल्यात मृत झालेल्याच्या वारसांना मिळणार आता 5 लाख रुपये; सरकारचा आदेश

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाच हजार रुपयेही देण्याचे आश्वासन दिले.

सकाळ डिजिटल टीम

यापूर्वी ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने (Panchayat Department) याबाबत आदेश बजावला होता.

बंगळूर : कुत्रे (Dogs) चावल्याने मृत झालेल्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याबाबत कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात हमी दिली. नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी नुकसान भरपाईची हमी न्यायालयात दिली.

त्याशिवाय कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाच हजार रुपयेही देण्याचे आश्वासन दिले. तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी महिन्याभरात बैठक घेण्याची सूचनाही न्यायालयाने केली.

यापूर्वी ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने (Panchayat Department) याबाबत आदेश बजावला होता. भटक्या कुत्र्यांचे संरक्षण, संतती नियंत्रण, भटक्या कुत्र्यांवर उपचार आणि निगा याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने जाहीर केली आहेत.

त्यात संबंधित ग्रामपंचायतींनी भटक्या कुत्र्यांनी चावलेल्या व्यक्तींना वैद्यकीय खर्चाची भरपाई द्यावी. मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई‌ दिली जावी, असे ही स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

Latest Maharashtra News Updates : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 12 नोव्हेंबरपासून होणार सुरु

SCROLL FOR NEXT