Improvement in flood situation in Assam Sakal
देश

आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा

बहुतेक नद्यांच्या पाणीपातळीत घट ; मृतांची संख्या १३४

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी - आसाममधील पूरस्थितीमध्ये आज आणखी सुधारणा झाली. राज्यातील कोपिली आणि बराक या दोन नद्या वगळता बहुतेक नद्यांच्या पाणीपातळीत होणारी घट कायम आहे. पूरग्रस्तांची संख्याही कमी होऊन २१ लाखांवर आली. कच्चर जिल्ह्यातील सिल्चर शहरातील बहुतेक भाग मात्र आठवड्यानंतरही पाण्याखाली आहे. गेल्या २४ तासांत पुरामुळे आणखी पाचजणांचा मृत्यू झाला. एकजण बेपत्ता झाला. त्यामुळे, पूरबळींची संख्या १३४वर गेली आहे.

कोपिली आणि बराक या नद्या मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बाजाली जिल्ह्यातील कुवारा येथे फुटलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली. त्यांनी यावेळी पूरग्रस्तांशीही संवाद साधत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर, पुराचा मोठा फटका बसलेले सिल्चर शहर आठवड्यापासून पाण्यात आहे. तिथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अद्याप सुरू आहे.

सिल्चरमध्ये झालेल्या हानीचे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून ड्रोन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, प्रशासनाकडून शहरातील कचरा स्वच्छ करण्यात येत आहे. मात्र, नागरिक घर व दुकाने स्वच्छ करून कचरा पुन्हा रस्त्यांवर टाकत असल्याने अस्वच्छता पसरत आहे.

मदत छावण्यांत २ लाख नागरिक

राज्याचे मुख्य सचिव जिष्णू बारूआ यांनी बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांच्या उपायुक्तांबरोबर आभासी बैठक घेऊन मदतकार्याच्या सूचना दिल्या. आसाममधील २,२५४ गावे अद्याप पुराच्या पाण्यात असून ५३८ मदत छावण्यांत दोन लाख नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT