Delhi Air Pollution Esakal
देश

Delhi Air Pollution: दिल्लीच्या हवेत सुधारणा; पावसानंतर प्रदूषणापासून दिलासा, AQI 400वरून 100 वर घसरला

पावसानंतर प्रदूषणापासून दिलासा, AQI 400 वरून 100 वर घसरला

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिवाळीपूर्वी दिल्ली-एनसीआरमधील नागरीकांना हवामानाने मोठी भेट दिली आहे. दिल्ली-नोएडातील अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. हवामानातील बदलामुळे तापमानात घट झाली आहे. शिवाय प्रदूषणापासूनही मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील अनेक भागात AQI पातळी 400 वरून 100 पर्यंत घसरली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बवाना, कांझावाला, मुंडका, जाफरपूर, नजफगड, नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथे पाऊस झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बहादुरगड, गुरुग्राम, मानेसरसह एनसीआरच्या काही भागात पाऊस झाला. यासोबतच हरियाणातील रोहतक, खरखोडा, मत्तानहेल, झज्जर, फारुखनगर, कोसली या परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रदूषणापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरापासून दक्षिण-पश्चिम दिल्ली, एनसीआर (गुरुग्राम) तसेच हरियाणातील वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस झाला. गोहाना, गन्नौर, मेहम, सोनीपत, खरखोडा, चरखी दादरी, मत्तानहेल, झज्जर, फारुखनगर, कोसली, सोहना, रेवाडी, बावलमध्ये रिमझिम पाऊस झाला आहे. राजस्थानच्या भिवाडीमध्येही पावसाची शक्यता आहे.

आज दिल्लीचे हवामान कसे असेल?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीत ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीत 24 तासांचा सरासरी AQI 437 होता, जो "गंभीर" श्रेणीत येतो.

दिल्ली सरकारने घेतला कृत्रिम पावसाचा निर्णय

दिल्ली-एनसीआर आजकाल प्रदूषणाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारनेही कृत्रिम पावसाची तयारी केली आहे. 20 आणि 21 नोव्हेंबरच्या सुमारास दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत.

20 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील पावसाची व्यवस्था

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली सरकारने कृत्रिम पावसाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी मुख्य सचिवांना आज सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्राने या निर्णयाला पाठिंबा दिल्यास दिल्ली सरकार 20 नोव्हेंबरपर्यंत शहरात कृत्रिम पावसाच्या पहिल्या टप्प्याची व्यवस्था करू शकते. मुख्य सचिवांना सुप्रीम कोर्टाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत की दिल्ली सरकारने IIT-कानपूर टीमच्या सल्ल्यानुसार कृत्रिम पावसाच्या फेज 1 आणि फेज 2 चा खर्च (एकूण 13 कोटी रुपये) उचलण्यास तत्वतः सहमती दर्शविली आहे.

काय म्हणाले पर्यावरण मंत्री?

पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आयआयटी-कानपूर टीमची भेट घेतल्यानंतर सांगितले होते की, अरविंद केजरीवाल सरकार दिल्लीतील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार! उद्धव ठाकरेंची कोल्हापूरात घोषणा, महायुतीवर हल्लाबोल

सुशांत सिंग राजपूतची हत्याच! सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा धक्कादायक दावा; म्हणाली- एम्सच्या डॉक्टरने रिपोर्ट...

IPS Sanjay Verma : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana : तुम्ही बळ दिलं तर... लाडक्या बहीणींना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन; डिंसेंबरच्या हप्त्याबद्दलही सांगितलं

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

SCROLL FOR NEXT