Bihar Crime Sakal
देश

लिंबू ठरलं खुनाचं कारण, सासू आणि नणंदांकडून गळा आवळून सुनेची हत्या

सकाळ डिजिटल टीम

पाटना : लिंबाच्या किंमती वाढल्यामुळे लिंबू चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, आता लिंबावरून खुनाची घटना घडल्याचे देखील समोर आले आहे. लिंबू तोडल्याच्या रागातून सासू आणि पतीच्या बहिणींनी सूनेचा गळा आवळून खून केला आहे. बिहारच्या (Bihar) पूर्व चंपारण जिल्ह्यातील छाउदादनो पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चैनपूर गावात घडली.

काजल देवी (२८), असे या मृत महिलेचे नाव आहे. चैनपूर गावातील रहिवासी सुनील बैठा यांच्या त्या पत्नी आहेत. मृत महिलेचा पती आणि सासरे दोघेही कामानिमित्त दुसऱ्या राज्यात राहतात. लिंबू तोडण्यावरून सासू आणि सूनेमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन्ही नणंद देखील आपल्या आईच्या मदतीला धावून आल्या. वाद इतका टोकाला पोहोचला की, सासूने सुनेची हत्या केली. सुनेच्या डोक्यावर आणि मानेवर दोरीच्या खुणा आढळून आल्या आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यामध्ये महिलेचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या आरोपी सासू आणि दोन्ही नणंद फरार आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत, असं छाउदादनोचे पोलिस अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Bat: ऑस्ट्रेलियात विराटची क्रेझ! विराटची बॅट खरेदी करायची असेल तर मोजावे लागतील चक्क १ लाख ६५ हजार रुपये

Amravati Assembly Election 2024: दुचाकीवरुन नेल्या ईव्हीएम मशीन; अमरावतीच्या गोपाल नगरमध्ये राडा

Nagpur Crime : धक्कादायक! नागपुरात मतदानानंतर ईव्हीएम घेऊन जाणा-या गाडीची जमावाने केली तोडफोड

Worli Vidhan Sabha Voting: शेवटच्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं; ठाण्याकडे निघालेला दौरा वरळीकडे वळला...

Vikramgad Assembly constituency Voting : मोखाड्यात मतदान यंत्राची संथ गती, सुर्यमाळ मध्ये रात्री ऊशीरा पर्यंत मतदान 

SCROLL FOR NEXT