देश

ब्रिटनसोबतच्या व्यापार करारात कापडावरील करात होणार कपात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराच्या (India-UK free trade agreement-FTA) ) चर्चेची दुसरी फेरी नवी दिल्लीमध्ये पार पडली आहे. या चर्चेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. झालेल्या चर्चेनुसार, कापडासह, मत्स्यपालन, फार्मास्युटिकल्स आणि कृषी उत्पादनांसाठी करामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. (India-UK free trade agreement)

दोन्ही देशांमध्ये 7 ते 18 मार्च दरम्यान होणार्‍या वाटाघाटींमध्ये कराराची किंवा मिनी एफटीएची शक्यता देखील तपासली जाण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देशांकडून काही संवेदनशील विषयांवर मतभेद दूर करण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

या वर्षी किमान सहा द्विपक्षीय व्यापार करार पूर्ण करण्याची इच्छा भारताची आहे. गेल्या आठवड्यात भारताने 90% भारतीय उत्पादनांवर शून्य-करासाठी UAE सोबत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारीचा करार (comprehensive economic partnership agreement - CEPA) केला होता. हा करार केवळ ८८ दिवसांमध्ये शक्य झाला.

मात्र, भारताने UAE सोबत केलेल्या कराराच्या तुलनेत UK सोबतच्या कराराची व्याप्ती ही अधिक व्यापक असणार आहे. यामध्ये लेदर, चपला, रत्ने आणि दागिने यासारख्या कामगार केंद्रित क्षेत्रांमधून कापड आणि निर्यातीवरील कर कपात करण्याचा भारताचा मानस आहे. असं दोन अधिकार्‍यांपैकी एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT