75th Independence Day 2021 LIVE updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा आढावा दिला. तसेच योजनांमुळे मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी रोजगार निर्मितीसाठी पॅकेज आणि नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा केली. तसेच गरिबांसाठी मोफत तांदूळ, भविष्यातील वाटचाल, शिक्षण योजना अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आपल्या भाषणात केला....
अमृतमोहत्सवाच्या सर्व क्षणाचे लाईव्ह अपडेट पाहा एका क्षणात....
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे आयुक्त कार्यालय ( कौन्सिल हॉल ) येथे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते
कोरोनाचे नियम पाळणं सर्वांसाठी बंधनकारक - ठाकरे
मागील दीड वर्षांपासून कोरोना योद्ध्यांनी जीवाची बाजी लावली, कोरोना लढ्यात मृत्यूमृखी पावलेल्या योद्धयांना ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली
शिथिलता देत असताना ऑक्सिजनचा साठा आणि प्रमाण हा निकष ठेवला आहे. त्यामुळे कोरोना नियम पाळावेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आणि आमृत मोहत्सवाच्या उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
देशवासियांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण संपवलं. जवळपास दीड तास त्यांनी भाषण केलं.
कवितेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला भविष्यातील भारतासाठीचा संकल्प
मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझा देशातील तरुणांवर, शेतकरी सर्वांवर विश्वास आहे. प्रत्येक लक्ष्य ते संपादन करु शकतात. आजपासून 25 वर्षांनी 2047 मध्ये जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा जे कोणी पंतप्रधान असतील ते आपल्या ते भाषणात ज्याचा उल्लेख करतील तो संकल्प आज देश करत आहे. हा माझा विश्वास आहे. - मोदी
पर्यावरणपूरक भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा केली. पर्यावरणपूरक उर्जेच्या दिशेनं भारताचं सर्वात मोठं पाऊल
कोरोना संकटानंतर भारतामध्ये नव्या वर्ल्ड ऑर्डरची शक्यता आहे. आज संपूर्ण जग भारताला नव्या दृष्टीने पाहतेय. दहशतवाद आणि विस्तारवाद या दोन्ही आव्हानांशी भारत लढत आहे. पूर्ण हिंमतीने उत्तरही दिलं जातेय. आपल्या सेनेचे हात मजबूत करण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही. - मोदींचा विश्वास
भारताच्या विकासासाठी, आत्मनिर्भर भारतासाठी...भारताचं Energy Independent होणं अनिवार्य आहे. त्यासाठी आपल्याला आज संकल्प करुयात की स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आपण भारताला Energy Independent करुयात - मोदी
देशातील सर्व सैनिकी शाळेत मुलींनाही शिक्षण घेता येणार -मोदी
एक वेळ होती जेव्हा संपूर्ण देशामध्ये खेळाला महत्व दिलं जात नव्हते. पालकही मुलांना त्यापासून परावृत्त करत होते. पण आता लोक जागरुक झाले आहेत. हा बदल आपल्या देशासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. आज खेळात बदल करण्यासाठी गती आणण्याची गरज आहे. आज ऑलम्पिकमध्ये पदके मिळवली जात आहेत. - मोदी
मातृभाषेतून सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारचं धोरण आहे. गरिबांना साक्षर करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण अत्यवश्यक आहे - मोदी.
भारताकडे राजकीय इच्छाशक्तींची कोणतीही कमी नाही, हे सर्व जग पाहत आहे. भारतात नव्या अध्याय लिहिला जात आहे. - मोदी
गरज नसलेले कायदे संपवण्यात आले. त्याचं ओझं कमी केलं. - मोदी
कालबाह्य कायद्याच्या कचाट्यातून देशाची सुटका करण्याची वेळ आली आहे. -मोदी
कालबाह्य झालेले नियम, प्रक्रिया रद्द करण्याचं केंद्र आणि राज्य सरकारला आवाहन
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मोदींनी काँग्रसवर केली टीका, आधीचं सरकार स्वत:चं ड्रायव्हिंग सीटवर होतं अशी केली टीका
नवे स्टार्टअप येत आहेत. सरकार या स्टार्टअपसोबत उभी आहे. आर्थिक मदत, करात सूट असं सर्व काही केलं जात आहे. करोनाच्या काळात हजारो नवे स्टार्टअप उभे राहिले. यशस्वीपपणे वाटचाल सुरु आहे. यांची बाजारकिंमत हजार कोटींपर्यत पोहोचत आहे. - मोदी
स्टार्टअपला आणखी बळ देण्यात येईल, छोट्या शहरातही स्टार्टअप उद्योगाला चालना देण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. - मोदी
निर्णात होणारी वस्तू ही देशाचं प्रतिनिधित्व करते, गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करण्याचं कंपन्यांना मोदींचं आवाहन
भारत सध्या तीन बिलियन डॉलर किंमतीच्या मोबाईल फोनची निर्यात करतो - मोदी
जागतिक बाजारात भारतीय उत्पादने पोहचली पाहिजेत, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत- मोदी
रेल्वे आणि जलमार्ग वाढवण्याचा निर्धार असल्याचं मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केलं.
75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 'वंदे भारत' रेल्वेची घोषणा
किसान 'रेल'मुळे कृषी उत्पादनाला मोठी बाजारपेठ मिळाली - मोदी
10 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दीड लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा केली - मोदी
80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रपळाची जमीन ही चिंतेची बाब आहे. कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणणार - मोदी
महिला गटाकडून निर्मिती केल्या जाणाऱ्या वस्तूंना जागतिक जागतिक बाजारपेठ मिळवून देणार -मोदी
केंद्र सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करणार - मोदी
सहकारवाद हा आपल्या परंपरेचा अविभाज्य घटक आहे. सहकारवाद ही प्रेरणा आहे. सहकारवादाचं सशक्तीकरण व्हावं म्हणून विशेष मंत्रालय स्थापन करण्यात आलं. - मोदी
गावखेड्यातील विकास आणि अर्थकरणावर सरकार काम करत आहे. गावही डिजिटल होत आहेत. तसेच रस्ते आणि वीज प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत पोहचले आहेत. - मोदी
विकास सर्वसमावेशक असला पाहिजे. याआधी करण्यात आलेल्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी प्रयत्न. जम्मू काश्मीर, लडाखसह सर्व भागांत विकास पोहचला पाहिजे - मोदी
वैद्यकिय शिक्षणात OBC ला आरक्षण देण्यात येत आहे - मोदी
गरिबांना स्वस्त औषधं उपलब्ध करुन दिली जात आहेत. - मोदी
गरिबांपर्यंत पोषणयुक्त आहार पोहचवण्याचा धेय आहे. रेशन दुकानांवर पोषणयुक्त तांदळाचं वाटप करण्यात येणार आहे. कुपोषणमुक्त भारत करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे -मोदी
सरकारी योजनापासून कुणीही वंचित राहाता कामा नये - मोदी
बदलणाऱ्या काळासोबत आपल्यालाही बदलायचं आहे - मोदी
आपल्याला आता स्वत:ला सिद्ध करुन दाखवायचं आहे - मोदी
भारतात कमी लोकांना संक्रमण झालं हे खरं आहे. तसंच लोकसंख्येच्या तुलनेच जास्त लोकांचा जीव वाचवू शकलो. - मोदी
सबक साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि आता सबका प्रयास याबरोबर आपण जोडलो गेलो आहोत. - मोदी
करोना माहामारीमध्ये भारताने ज्याप्रमाणे मोफत धान्य दिलं हा जगासाठी चर्चेचा विषय ठरला. - मोदी
आज आपण सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरु आहे. 54 कोटींहून अधिक लोकांनी लस घेतली आहे- मोदी
कोरोनासारख्या जागतिक महामारीमध्ये आहोरात्र लढणाऱ्या योद्ध्यांचे आभार. या संकटकाळात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, लस निर्मिती करणारे संधोधक, सफाई कर्मचारी आणि नागरिकांची सेवा करणारे सर्वजणांनी देशाला वाचवण्याचं काम केलं आहे. त्या सर्वांचं कौतुक आहे. - मोदी
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित ऑलिम्पिक खेळाडूंचं मोदी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलं. यावेळी त्यांनी देशवासियांना टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करण्याचं आवाहन केलं.
फाळणीच्या भीषण शोकांतिकेची आठवण म्हणून हा दिवस पाळला जाणार आहे. द्वेष आणि हिंसेमुळे आजच्या दिवशी आमच्या लाखो बंधू भगिनी व मातांना जबरदस्तीने विस्थापित व्हावे लागले. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस पाळण्यात येईल - मोदी
यंदापासून दरवर्षी १४ ऑगस्टा हा दिवस फाळणी वेदना (विभाजन विभीषिका) स्मृतिदिन म्हणून पाळला जाईल - मोदी
75 व्या स्वातंत्र्य दिनाला, तुम्हा सर्वांना शुभेच्छा - मोदी
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आणि सुरक्षारक्षकांकडून ठिकठिकाणी वाहणांची तपासणी करण्यात येत आहे.
आजादी का आमृत मोहत्सव 2023 पर्यंत सुरु राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्यावर ध्वजारोहण झाले. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.
लडाखमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी तिरंगा फडकावत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली, थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार
नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग आठव्यांदा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर सकाळी ७.३० वाजता मोदींच्या भाषणाला सुरुवात होईल.
सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली वाहतील.
भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस. लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमावर भारतीय वायुदलाच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी लाल किल्ल्यावर उपस्थिती दर्शवली आहे.
BJP अध्यक्ष जे.पी नड्डा लाल किल्ल्यावर पोहचले
भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस. या कार्यक्रमाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्रासहित इतर 32 खेळाडूंना विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे.
कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहूया!, असे ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आज विविध पदकांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील ७४ जणांचा या पदकांनी सन्मान केला जाणार आहे. यात २५ जणांना पोलिस शौर्यपदके, तीन जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ३९ पोलिस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येतील.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनी जाहीर होणाऱ्या शौर्य पदकांवर यंदा जम्मू काश्मीर पोलिसांची छाप उमटली आहे. महत्त्वाचा लष्करी सन्मान मानली जाणारी अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि आणि शौर्य चक्रे देखील याच विभागाला मिळाली आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबू राम यांना अशोक चक्र (मरणोत्तर), कॉन्स्टेबल अल्ताप हुसैन भट कीर्ती चक्र (मरणोत्तर) आणि विशेष पोलिस अधिकारी शहाबाझ अहमद यांनाही शौर्यचक्र (मरणोत्तर) जाहीर झाले आहे. हे तिन्ही सन्मान एकाच वेळी मिळविण्याची जम्मू काश्मीर पोलिसांची ही पहिलीच वेळ आहे.
75 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई, दिल्लीसह सर्वच शहरातील सुरक्षा यंत्रणांकडून ठिकठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
स्वातंत्र्य दिनाला भारताचे पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. यासाठी लाल किल्ल्याच्या मेन गेटजवळ शिपिंग कंटेनरची भिंत उभारण्यात आली आहे.
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मोदींनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. हा आमृतमोहत्सव देशाला नवी चेतना आणि उर्जा देणारा ठरो, अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.