9 ऑगस्ट 1925 रोजी घडलेल्या काकोरी घटनेने इंग्रजांची झोप उडवली होती. या एका घटनेने संपूर्ण देशातील लोकांचा क्रांतिकारकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. क्रांतीची मशाल घेऊन पुढे जाणारे भारतमातेचे सुपुत्रच त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची कथा लिहितील, हे सर्वसामान्यांना समजले होते.
राम प्रसाद 'बिस्मिल' आणि त्यांच्या साथीदारांनी काकोरी स्टेशनवर रेल्वेतून ब्रिटिश सरकारचा खजिना लुटला. त्यानंतर एक-एक करून सर्व क्रांतिकारकांना अटक करण्यात आली. सुमारे 40 जणांना अटक करण्यात आली.
काकोरी घटनेसाठी या क्रांतिकारकांवर खटला सुरू करण्यात आला. ब्रिटीश सरकारकडे सैन्यासह आर्थिक पाठबळही अधिक होते आणि म्हणून त्यांनी क्रांतिकारकांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी अनेक लोकांना लाच दिली.
दुसरीकडे, बिस्मिल आणि त्यांच्या साथीदारांना खटला लढण्यासाठी पैशाची आवश्यक होती. पण घरदार सोडून देशसेवेचे कार्य हाती घेतलेले क्रांतिकारकारी पैसा कुठून आणणार? आणि मग अशा परिस्थितीत 'सुशीला दीदी' त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या!
पंजाब राज्यात जन्मलेल्या सुशीला आपल्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच क्रांतीकारी कार्यात सामील झाल्या. त्या लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते आणि वडील ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी करत होते.
आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी अनेक वेळा क्रांतिकारकांना पाठिंबा दिला. बिस्मिल आणि त्यांच्या साथीदारांना खटल्यासाठी पैशांची गरज असताना सुशीला दीदींनी त्यांना 10 तोळे सोन्याची मदत केली. हे सोने त्यांच्या आईने त्यांच्या लग्नासाठी सुरक्षित ठेवले होते. पण सुशीला यांनी आपल्या सुखाच्या आधी क्रांतिकारी मित्रांची मदत करणे अधिक महत्त्वाचे वाटत होते.
काकोरी घटनेच्या निर्णयात चार क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली आणि संपूर्ण देशात शोककळा पसरली, पण सुशीला दीदींची पावले थांबली नाहीत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले. भगतसिंग यांच्या खटल्यासाठी त्यांनी देणग्याही गोळा केल्या.
क्रांतीच्या लढ्यात त्या स्वतः तुरुंगात गेल्या पण मागे हटल्या नाहीत. सुशीला दीदींनी स्वतंत्र भारताच्या चळवळीत योगदान दिले आहे. त्या दिल्लीत वास्तव्यास होत्या पण आपल्या बलिदानाच्या मोबदल्यात त्यांनी सरकारकडून कोणत्याही मदतीची किंवा बक्षीसाची अपेक्षा कधीच केली नाही.
शहीद राम प्रसाद ‘बिस्मिल’ यांच्या सच्चा साथीदाराला कोटी कोटी प्रणाम !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.