भारत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाची तयारी जोरात सुरू असून ती आता अंतिम स्वरुपात आली आहे. दरम्यान, 'हर घर तिरंगा अभियान' आजपासून सुरू झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवत आहे. बऱ्याच लोकांनी आपल्या घरावर ध्वज फडकावला आहे. हर घर तिरंगा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
राष्ट्रीय वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिमेचा एक भाग म्हणून लोकांना घरोघरी राष्ट्रध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आधीच आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना तिरंगा घरोघरी लावण्याचे आवाहन केले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत हे अभियान सुरू करण्यात आले आहे. 22 जुलै रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. या मोहिमेमुळे तिरंग्याशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे पंतप्रधानांनी ट्विट केले होते.
'हर घर तिरंगा' मोहिमेबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी देशात तिरंगा सार्वजनिक ठिकाणी फडकवल्यास सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी फडकावण्याचा नियम होता. जुलै 2022 मध्ये सरकारने त्यात सुधारणा केली आणि आता लोकांना त्यांच्या घरी कधीही राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे.
या हर घर तिरंगा मोहिमेला नागरिकांकडून जसा चांगला प्रतिसाद मिळत तसेच टीकाही करण्यात येत आहे. फुटपाथवर राहून मिळेल ते काम करून पोट भरणाऱ्या शेकडो बेघरांनी ‘तिरंगा’ लावायचा कुठे, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.
तिरंग्याच्या मागणीत मोठी वाढ
'हर घर तिरंगा अभियाना'चा परिणाम आधीच दिसून येत आहे. देशात तिरंग्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, पीएम मोदींनी या मोहिमेची घोषणा केल्यापासून तिरंग्याची मागणी 50 पटीने वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा करणे व्यापारी व कारखानदारांना अवघड झाले असल्याची परिस्थिती आहे. राष्ट्रध्वज पुरवण्याचा व्यवसाय करणारे व्यापारीही तिरंग्याला एवढी मोठी मागणी यापूर्वी कधीच पाहिली नसल्याचे सांगत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.