Independence Day Red Fort : संपूर्ण भारताचा अभिमान असलेल्या लाल किल्ल्याला खूप मोठा इतिहास आहे. हा लाल किल्ला भारताची शान आहे. १५ ऑगस्ट १९४७ साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून जेव्हा भारत मुक्त झाला तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून प्रथमच ध्वजारोहण केले होते. यावेळी त्यांनी देशाला संबोधन देखील केले होते.
देशात अमन, चैन, शांतिचा संकल्प यावेळी त्यांनी केला होता आणि देशाचा विकास करण्याचा संकल्प यावेळी नेहेरूंनी केला होता. तेव्हापासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे.
लाल किल्ला १६३८ साली बादशहा शहाजहान यांनी लाल किल्ला बांधला होता. त्या नंतर मुघलांची राजधानी आग्राहून दिल्लीला हलवण्यात आली. दिल्लीच्या मध्यभागी यमुना नदीजवळ हा भव्य किल्ला बांधण्यात आला. किल्ला तिन्ही बाजूंनी यमुना नदीने वेढलेले आहे.या किल्ल्याचे बांधकाम 1638 ते 1648 पर्यंत सुरु होते.
लाल किल्ला लाल वाळूचा दगडाच्या साहाय्याने बांधण्यात आला होता. याच बरोबर पांढरे संगमरवरी दगडही यात होते. हा किल्ला बांधला तेव्हा अनेक मौल्यवान हिरे आणि सोन्या-चांदीने सजवलेला होता, पण इंग्रजांनी लाल किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी या किल्ल्यातील सर्व मौल्यवान हिरे आणि धातू बाहेर काढले. .भारताची हि भव्य ऐतिहासिक वास्तू सुमारे 30 मीटर उंच दगडी भिंतीने वेढलेली आहे
देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या किल्ल्याचे महत्त्व कमी झाले नाही, भारतीय सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता. हे एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. २००७मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट केला गेला. आज जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक किल्ल्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दिल्लीत येतात.
लाल किल्ल्याबद्दल मनोरंजक माहिती
शाहजहानने आग्राऐवजी दिल्लीला आपली राजधानी बनवण्यासाठी १६४८ मध्ये पूर्ण झालेल्या जुन्या किल्ल्याच्या जागेवर १६३८ मध्ये लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू केले.
1648 मध्ये लाल किल्ल्याचे उद्घाटन झाले तेव्हा त्यातील मुख्य खोल्या महागड्या पडद्यांनी सजवण्यात आल्या होत्या.
हा किल्ला बांधण्यासाठी सुमारे १ कोटी रुपये लागले होते. तेव्हाच्या काळी हा किल्ला सगळ्यात महाग किल्ला होता.
एक कोटी रुपयांपैकी निम्मा हा भव्य महाल बांधण्यासाठी खर्च झाला.
लाल किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत. एक लाहोर गेट आणि दुसरा दिल्ली गेट. लाहोर गेट सामान्य पर्यटकांसाठी तर दिल्ली गेट सरकारसाठी आहे.
ताजमहालाप्रमाणे लाल किल्लाही यमुना नदीच्या काठावर बांधला गेला आहे. लाल किल्ल्याभोवतीचा खंदक यमुनेच्या पाण्याने भरलेला होता.
11 मार्च 1783 रोजी शिखांनी लाल किल्ल्यावर हल्ला करून तो मुघलांपासून मुक्त केला. या पराक्रमाचे श्रेय सरदार बघेलसिंग धालीवाल यांना जाते.
लाल किल्ला बांधण्यासाठी लाल वाळूच्या दगडांचा वापर करण्यात आला, त्यामुळे त्याला लाल किल्ला असे नाव पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.