india aghadi Sakal
देश

India Aghadi : ‘इंडिया’कडून नव्या घटकपक्षांची चाचपणी

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून यात पुढील रणनीतीवर विचार करण्यात येणार आहे. इंडिया आघाडीत नव्या घटकपक्षांना सामील करून घेण्यावर या बैठकीत निर्णय होणार आहे.

भाजपला बहुमत न मिळाल्याने इंडिया आघाडीने सरकार स्थापनेचा दावा करायचा की नाही, यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीत घेण्याच्या संदर्भात काँग्रेस वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. इंडिया आघाडीला सरकार स्थापनेसाठी या दोन्ही नेत्यांच्या सहकार्याची आवश्यकता भासणार आहे.

इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय सरकार स्थापनेच्या दाव्याबाबत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले आहे. टीडीपी व जेडीयू शिवाय इतर छोट्या पक्षांशीसुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, ‘आरजेडी’चे नेते तेजस्वी यादव, सीपीआयचे डी. राजा, झारखंड मुक्तीमोर्चाच्या नेत्या कल्पना सोरेन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, आपचे संजय सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT