विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये आता २६ पक्षांचा समावेश असेल. यातील अनेक पक्षांची विविध राज्यांत सत्ता असून काही पक्ष इतरांच्या मदतीने सत्तेमध्ये आहेत. काही पक्ष हे पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिसतात.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
खासदार - ८० (४९ लोकसभा, ३१ राज्यसभा)
सत्ताधारी - कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचलप्रदेश
येथे सत्तेत सहभाग - बिहार, तमिळनाडू आणि झारखंड
तृणमूल काँग्रेस (टीएमसी)
खासदार - ३५ (२३ लोकसभा आणि १२ राज्यसभा)
सत्ताधारी - पश्चिम बंगाल, प्रभाव - मेघालय आणि अन्य राज्ये
द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) :
खासदार - ३४ (२४ लोकसभा आणि १० राज्यसभा), सत्ताधारी - तमिळनाडू ,
आम आदमी पक्ष :
खासदार - ११ (१ लोकसभा आणि १० राज्यसभा), सत्ताधारी दिल्ली आणि पंजाब
जनता दल (संयुक्त) :
खासदार - २१ (१६ लोकसभा आणि ५ राज्यसभा), सत्ताधारी - बिहार
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) :
खासदार - सहा (सर्व राज्यसभा सदस्य), सत्तेत सहभाग - बिहार
झारखंड मुक्ती मोर्चा :
खासदार - ३ (१ लोकसभा आणि २ राज्यसभा)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) :
निश्चित संख्या नाही
शिवसेना (ठाकरे गट) :
निश्चित संख्या नाही
समाजवादी पक्ष :
खासदार - ६ (३ लोकसभा, ३ राज्यसभा) प्रभावक्षेत्र - उत्तरप्रदेश
राष्ट्रीय लोकदल :
खासदार - १ (जयंत चौधरी) प्रभावक्षेत्र - पश्चिम उत्तरप्रदेश
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स :
खासदार - ३ (लोकसभा) प्रभावक्षेत्र - जम्मू- काश्मीर
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष :
खासदार - आठ (३ लोकसभा आणि ५ राज्यसभा) सत्ताधारी - केरळ, प्रभाव - पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि तमिळनाडू
भारतीय कम्युनिस्ट पक्ष :
खासदार - ४ (२ लोकसभा, २ राज्यसभा)
रिव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पार्टी :
खासदार - १ (लोकसभा) प्रभाव - पश्चिम बंगाल, त्रिपुरा
एमडीएमके :
खासदार - १(राज्यसभा)
व्हीसीके :
खासदार - १, प्रभावक्षेत्र - तमिळनाडू
केएमडीके :
खासदार - १ प्रभावक्षेत्र - तमिळनाडू
इंडियन युनियन मुस्लिम लीग :
केरळमध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष खासदार - ४ (३ लोकसभा १ राज्यसभा)
केरळ काँग्रेस (एम) :
खासदार - २ (१ लोकसभा आणि १ राज्यसभा),प्रभावक्षेत्र - केरळ
खालील पक्षाचा एकही सदस्य लोकसभेत व राज्यसभेत नाही
केरळ काँग्रेस (जोसेफ)
एमएमके
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी- लेनिनवादी)
अपना दल (कामेरावादी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.