तुम्ही कोरोना लसीकरण केलं नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
भारतात कोरोनाची (Coronavirus in India) प्रकरणं आता जवळपास नगण्य आहेत. मात्र, या जीवघेण्या विषाणूनं शेजारील देश चीनमध्ये (China) पुन्हा कहर केलाय. भारतात 2020 ची पहिली केस चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्याची होती. कोरोनामुळं आता सरकारही सतर्क झाल्याचं दिसून येत आहे.
पुढील महिन्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं जर तुम्ही अंदमान-निकाबोर बेट (Andaman-Nicobar Islands), पोर्ट ब्लेअर किंवा लडाखमधील (Ladakh) लेह इथं जात असाल आणि तुम्ही कोरोना लसीकरण केलं नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्याकडं RT-PCR चाचणीचा अहवाल असणं गरजेचं आहे. परंतु, यामुळं नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु, काही राज्यांनी अजूनही निर्बंध तसेच ठेवले आहेत. कारण, अशा राज्यांमध्ये प्रवास सुरू करण्यापूर्वी 48 ते 96 तासांच्या आत RT-PCR चाचणीचा अहवाल द्यावा लागणार आहे. दक्षिण अंदमानचे उपायुक्त सुनील अंचिपाका यांनी पीटीआयला सांगितलं की, 'केंद्रशासित प्रदेश पोर्ट ब्लेअर विमानतळावर लसीकरण न केलेल्या प्रवाशांसाठी RT-PCR अनिवार्य आहे. आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार आम्ही त्याचं पालन करत आहोत.'
अंदमान-निकोबार व्यतिरिक्त लडाख हा देखील असा केंद्रशासित प्रदेश आहे, जिथं लसीकरण न केलेल्या प्रवाशांसाठी लेह विमानतळावर RT-PCR चाचणी अनिवार्य आहे. लेहमधील आरोग्य सेवा संचालक डॉ. मोटूप दोरजे म्हणाले, आम्ही काही पर्यटकांच्या निवडक आधारावर आरटी-पीसीआर चाचण्या घेत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.