bjp on congress presidential mallikarjun kharge statement on bakri eid  esakal
देश

INDIA Alliance : इंडिया आघाडीचं चाक कुठे रुतलं? नितीश कुमार नाराज होताच काँग्रेस खडबडून जागं

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली:गेल्या दोन महिन्यांपासून ‘इंडिया’आघाडीची गाडी पुढे न सरकल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसला खडबडून जाग आली. शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

गेल्या १ सप्टेंबरला मुंबईत ‘इंडिया’ आघाडीच्या २८ पक्षांच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हे नेते भेटले नाही. लोकसभेसाठी जागा वाटपासाठी नियुक्त केलेल्या समन्वय समितीची केवळच एकच बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील येथील निवासस्थानी झाली होती. यानंतर समन्वय समितीची सुद्धा बैठक झाली नाही.

यामुळे या आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी वाढत आहे. या नाराजीला मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीरपणे वाचा फोडली. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वावर तोफ डागली होती. परंतु काही दिवसांनी त्यांनी काँग्रेसच्या नेत्याचा फोन आल्यानंतर त्यांनी काँग्रेसशी कोणतेही मतभेद नसल्याची सफाई दिली.

पुढील बैठक दिल्लीत

‘इंडिया’ आघाडीची चर्चा पुढे जायला पाहिजे, परंतु काँग्रेसचे नेते प्रचारात गुंतलेले आहेत. त्यांना या आघाडीवर चर्चा करायला निवडणुकीपर्यंत वेळ नसल्याचे वक्तव्य केले होते. या विधानाचा रोख काँग्रेसकडे होते. काँग्रेसला या आघाडीपेक्षा राज्यांच्या निवडणुकांमध्ये अधिक रस असल्याचे यातून स्पष्ट होत होते.

या विधानाची दखल घेऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दूरध्वनीवरून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसचे सर्व नेते सध्या पाचही राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर लगेच ही बैठक दिल्लीत करण्यात येईल, असे आश्वासन खर्गे यांनी यावेळी दिले. पाच राज्यांचा प्रचार येत्या २८ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यानंतरच या आघाडीची बैठक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT