India Aghadi Sakal
देश

India Alliance: काँग्रेसच्या भूमिकेमुळे ‘इंडिया’ आघाडीत अस्वस्थता !

सकाळ डिजिटल टीम

India Alliance: लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली येत असतानाही काँग्रेसची वेळकाढूपणाच्या भूमिकेमुळे ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. या नाराजीला आता तोंड फुटू लागले असून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीत वाढत असलेल्या अस्वस्थतेचे संकेत दिले आहेत.

मोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी पुढाकार घेतला. यात आघाडीच्या तीन बैठक पाटणा, बंगळूर व मुंबईत बैठकासुद्धा झाल्या. शेवटची बैठक मुंबईत १ सप्टेंबरला झाली होती. त्यानंतर या आघाडीची गाडी पुढे सरकलेली नाही. जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही ‘इंडिया’च्या जागा वाटपाचे सूत्र न ठरल्याने आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.

सपचा एल्गार

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात ६५ उमेदवारांची यादी तयार असल्याचे सांगून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. उत्तर प्रदेशात एकूण ८० लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ६५ मतदारसंघांवर सपने दावा सांगितल्यानंतर काँग्रेस व जयंत चौधरी यांच्या नेतृत्वातील रालोदच्या वाट्याला केवळ १५ लोकसभा मतदारसंघ उरतात. त्यापैकी अमेठी व रायबरेली या दोन मतदारसंघात सपचा उमेदवार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात जागा वाटपावरून झालेल्या वादात काँग्रेस व सपमध्ये वाद झाला होता. या वादाची परिणती आता काँग्रेसला कोंडीत पकडण्यात होण्याची अधिक शक्यता दिसत आहे.

बिहारमध्येही नाराजी

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही काँग्रेसच्या विरोधात नाराजी प्रकट केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे ‘इंडिया’ आघाडीच्या चर्चेला विराम देणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्यात रस आहे.

सध्याच्या सर्वेक्षणानुसार पाच राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली दिसत असल्याने या निवडणुकांचे निकाल काँग्रेसच्या बाजूने लागल्यास ‘इंडिया’ आघाडीत उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जागा वाटपात अधिक हिस्सा मागता येईल, असा होरा काँग्रेसच्या नेतृत्वाचा आहे.

काँग्रेसच्या या डावपेचामुळे ‘इंडिया’आघाडीत रोष वाढत आहे. याचा भडका आता होऊ लागला आहे. त्यामुळेच अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी कोणतीही चर्चा न करता ६५ जागांवर उमेदवार लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur South-West Constituency: फडणवीसांविरोधात कोण? नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून 41 अर्जांची उचल

Sharad Pawar: महाविकास आघाडीची चर्चा सुरु तर तुतारीचे बहुतांश उमेदवार निश्चित? प्रचार सुरु करण्याच्या सुचना!

Latest Maharashtra News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात होणार द्विपक्षीय चर्चा

Shivsena Candidate List : बंडात साथ देणाऱ्या 'या' तिघांना शिंदेंच्या पहिल्या यादीत स्थान नाही! कोण कुठून लढणार वाचा एका क्लिकवर

Eknath Shinde : शिंदे, वायकर, सामंत बंधू ते पाटील,जाधव; शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर, वाचा यादी एका क्लिकवर!

SCROLL FOR NEXT