Awadhesh Prasad
Awadhesh Prasad Esakal
देश

INDIA: अयोध्या जिंकणारा खासदार ठरणार जायन्ट किलर? लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी 'इंडिया'चा मोठा डाव

आशुतोष मसगौंडे

लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी फैजाबादमधून (अयोध्या) निवडून आलेले समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद इंडिया आघाडीचे उमेदवार असतील हे विरोधी पक्षांनी जवळपास निश्चित केले आहे.

प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील प्रमुख मित्रपक्ष समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चेत अवधेश यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विरोधी पक्ष उपाध्यक्ष पदाच्या मागणीवर ठाम आहे. पण एनडीए सरकारला निवडणुकीशिवाय उपाध्यक्षपद विरोधकांना द्यायचे नाही. त्यामुळेच विरोधकांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता.

संसदेच्या अध्यक्षपदाइतकेच उपाध्यक्ष पद महत्त्वाचे आहे. घटनेच्या कलम 95 मध्ये असे म्हटले आहे की जेव्हा ते पद रिक्त होते किंवा अध्यक्ष अनुपस्थित असतात तेव्हा उपाध्यक्ष अध्यक्षाची जबाबदारी पार पाडतात.

जर उपाध्यक्ष पद रिक्त असेल आणि अध्यक्षही उपस्थित नसतील तर अशा परिस्थितीत राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले लोकसभा खासदार सभागृहाचे कामकाज हाताळतात. राज्यघटनेने जे अधिकार उपसभापतींना दिले आहेत तेच अधिकार उपसभापतींनाही दिले आहेत.

कोण आहेत अवधेश प्रसाद?

फैजाबाद मतदारसंघातून खासदार होण्यापूर्वी अवधेश प्रसाद हे अयोध्या जिल्ह्यातील मिल्कीपूर विधानसभेचे आमदार होते. ते दीर्घकाळापासून समाजवादी पक्षाशी संबंधित आहेत आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या जवळचे होते.

अवधेश प्रसाद यांनी जनता पक्षातून राजकारणाला सुरुवात केली आणि 1977 मध्ये अयोध्या जिल्ह्यातील सोहावल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. यानंतर अवधेश प्रसाद यांनी मागे वळून पाहिले नाही आणि 1985, 1989, 1993, 1996, 2002, 2007 आणि 2012 च्या विधानसभा निवडणुका जिंकत राहिले.

अवधेश प्रसाद यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 54567 मतांनी विजय मिळवला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. एकीकडे सपा उमेदवार अवधेश प्रसाद यांना ५५४२८९ मते मिळाली, तर लल्लू सिंह यांना केवळ ४९९७२२ मते मिळाली.

यासह भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने तब्बल 36 जगा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी अवधेश प्रसाद यांना संधी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Arrival : चाहत्यांच्या जनसागरात हरवली टीम इंडिया! दिवसाची सुरूवात रोहितनं तर शेवट केला हार्दिकनं

Victory Parade: जनसागरातही मुंबईकरांना समाजभान! चाहत्यांनी क्षणात करून दिली रूग्णवाहिकेला वाट

मोठी ब्रेकिंग! गुळवंचीत वीजेचा शॉक लागून 24 म्हशींचा मृत्यू; ओढ्याच्या पाण्यातच पडली वीजेची तार

Natasa Stankovic post viral :देवा माझं रक्षण कर... पांड्या मायदेशी परतताच पत्नी नताशाचा क्रिप्टिक मेसेज

Hardik Pandya : मुंबईत पोहोचताच वर्ल्डकपची ट्रॉफी हार्दिकच्या खांद्यावर; Video होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT