Corona  
देश

भारताला मोठं यश; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला 'कल्चर' करणारा पहिला देश

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताने ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनबाबत एक मोठं यश प्राप्त केलं आहे. भारत हा जगातील असा एकमेव देश बनला आहे ज्या देशाला नव्या स्ट्रेनला वेगळं करण्यास यश मिळालं आहे. Indian Council of Medical Research (ICMR)ने याबाबतची माहिती काल शनिवारी दिली आहे. ICMR ने ट्विट करुन म्हटलंय की ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराला (स्ट्रेन) भारताने यशस्वीरित्या 'कल्चर' केलं आहे. 'कल्चर' ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत पेशींना नियंत्रित परिस्थितीमध्ये वाढवलं जातं आणि सामान्यत: त्यांच्या नैसर्गिक वातावरणातून त्यांना बाहेर काढलं जातं. 

ICMR ने म्हटलं जगात फक्त भारताला यश
ICMR ने एक करुन असा दावा केलाय की इतर कोणत्याही देशाला आतापर्यंत ब्रिटनमध्ये सापडलेल्या सार्स-कोव-2 च्या नव्या प्रकाराला यशस्वीरित्या 'कल्चर' करता आलं नाहीये. ICMR ने म्हटलंय की, ब्रिटनमध्ये सापडलेल्या स्ट्रेनच्या सर्व प्रकारांना राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV) मध्ये आतापर्यंत यशस्वीरित्या पृथक म्हणजेच अलग आणि 'कल्चर' केलं गेलं आहे. यासाठीचे नमूने ब्रिटनमधून परतलेल्या लोकांकडून घेतले गेले होते.

हेही वाचा - Breaking: स्वदेशी भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' लशीच्या वापराला मंजुरी​
भारतामध्ये नव्या कोरोना व्हायरसने संक्रमित 29 लोक
ब्रिटनने अलिकडेच अशी घोषणा केली होती की, तिथल्या कोरोना संक्रमित लोकांमध्ये विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा नवा स्ट्रेन 70 टक्क्यांपर्यंत अधिक संसर्गजन्य आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी म्हटलं होतं की, सार्स-कोव-2 च्या या नव्या स्ट्रेनमुळे भारतात आतापर्यंत एकूण 29 लोक संक्रमित झाल्याची माहिती मिळाली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT