India-China Troops Clashed esakal
देश

India-China Clashed : भारत-चीन संघर्षाची 108 वर्षे जुनी कहाणी; 'या' 5 घटनांनी बदलला इतिहास!

..त्यावेळी चिनी सैनिकांचा सामना करताना भारतातील अनेक जवान शहीद झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

..त्यावेळी चिनी सैनिकांचा सामना करताना भारतातील अनेक जवान शहीद झाले होते.

India-China Troops Clashed : अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाल्याची घटना समोर आलीय. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 डिसेंबरच्या रात्री घडली. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. जखमी झालेल्या चिनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांपेक्षा जास्त आहे. सुमारे 300 सैनिकांसह चीन जोरदार तयारी करून आला होता, परंतु भारतही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल याबाबत ते गाफील होते. आता या भागातील भारताच्या कमांडरनं प्रदेशात शांतता पुनर्संचयित करण्यासाठी एक बैठकही घेतली. मे 2020 मध्येही अशीच एक घटना समोर आली होती. तेव्हा चिनी सैनिकांचा सामना करताना भारतातील अनेक जवान शहीद झाले होते. या फक्त दोन अलीकडील घटना आहेत. पण, हा संघर्ष 100 वर्षे जुना आहे.

तिबेट करारावर स्वाक्षरी करण्यास चीनचा नकार

दोन्ही देशांमधील हा संघर्ष 1914 शी जोडला जाऊ शकतो. जेव्हा ब्रिटन, चीन आणि तिबेटचे प्रतिनिधी शिमल्यात दाखल झाले होते. तिबेटची स्थिती निश्चित करण्यासाठी चीन, ब्रिटिश आणि भारत यांच्यातील सीमारेषेवरील करारावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. विशेष म्हणजे, चीननं स्वाक्षरी करण्यास नकार दिला, पण ब्रिटन आणि तिबेटनं या करारावर स्वाक्षरी केली. या रेषेला मॅकमॅहन लाइन म्हणतात. 550 मैल लांबीची ही रेषा भारत आणि चीन यांच्यातील अधिकृत सीमा आहे, असं भारताचं मत आहे. मात्र, चीननं ते कधीच मान्य केलं नाही.

प्रकरण युद्धापर्यंत पोहोचलं

1962 मध्ये हे प्रकरण युद्धापर्यंत पोहोचलं. तेव्हा भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि दोन वर्षांनंतर माओ त्से तुंग यांनी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना केली. यानंतर काही वेळातच सीमेवरून दोन्ही देशांत वाद सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 1950 च्या दशकात तणाव वाढला. तिबेट कधीही स्वतंत्र नव्हतं आणि आंतरराष्ट्रीय सीमेसाठी करारावर स्वाक्षरी करू शकत नाही, असा चीनचा दावा आहे. चीननं आपल्या शिनजियांगमधील अनेक प्रमुख रस्त्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं भारत आणि मित्र राष्ट्रांमध्ये संताप निर्माण झाला.

युद्ध सुरू झालं

चिनी सैनिक मॅकमॅहन रेषा ओलांडून भारतीय हद्दीत पोहोचले. हे युद्ध सुमारे 1 महिना चाललं आणि दोन्ही बाजूंनी रक्तपात झाला. नोव्हेंबरमध्ये चीनच्या झोऊ एनलाईनं युद्धाला पूर्णविराम दिला आणि अनौपचारिकपणे सीमारेषा आखण्यात आली. याला एलएसी म्हणतात.

भारतानं चीनचा पाठलाग केला

1967 मध्ये सिक्कीमला जोडणाऱ्या नाथू ला आणि चो ला इथं पुन्हा तणाव निर्माण झाला. सीमेवर भारतीय लष्करानं तारा टाकण्यास सुरुवात केल्यावर चकमक झाली. चिनी सैन्याच्या गोळीबारानंतर चकमक वाढली आणि रक्तपात झाला. 1967 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या संघर्षांना भारत आणि चीनमधील दुसरे युद्ध म्हणून संबोधलं जातं. त्या काळात भारत खंबीरपणे उभा राहिला आणि नथुलामध्ये चीनचा पाठलाग केला. विशेष म्हणजे, ही घटना गलवन व्हॅलीपूर्वी घडली होती.

1987 मध्ये युद्धासारखी परिस्थिती

साधारण 1987 सालची गोष्ट आहे. सीमेवर किती सैन्य पाठवता येईल, यासाठी भारतीय लष्कर प्रशिक्षण मोहीम राबवत होतं. आता मोठ्या संख्येनं सैनिक चिनी चौक्यांवर आलेलं पाहून चिनी कमांडर आश्चर्यचकित झाले. त्यांनी ज्या LAC वर विश्वास ठेवला त्यावर पुढं जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, युद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच भारत आणि चीननं डी-एस्केलेशनचा मार्ग स्वीकारला.

हिंसक चकमकीत 40 भारतीय जवान शहीद

जून 2020 मध्ये लडाखच्या गलवान खाटीमध्ये चिनी सैनिकांनी LAC ओलांडल्यावर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसक चकमकीत 40 भारतीय जवान शहीद झाले. गलवानमध्ये अजूनही दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. अशा परिस्थितीत चीननं पुन्हा एकदा चिथावणीखोर कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT