akhilesh yadav, arvind kejriwal, uddhav thackeray  
देश

INDIA : 'इंडिया' आघाडीत पंतप्रधान पदासाठी तीन नावं चर्चेत, पण शर्यतीतून केजरीवाल यांची माघार

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होऊ घातली आहे. मात्र या बैठकीपूर्वीच पंतप्रधानपदासाठी तीन नावे चर्चेत आले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा समावेश आहे. मात्र त्याआधीच आपकडून केजरीवाल पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं.

आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. 'आप'च्या प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानपदाचे दावेदावर असावे, असं म्हटलं होतं. यावर आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना केजरीवाल पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं म्हटलं.

याआधी पंतप्रधानपदासाठी उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांचे नाव देखील आले आहे. 'आप'कडून केजरीवाल पतंप्रधान पदाचे उमेदवार नसल्याचं स्पष्ट केलं. तर उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी देखील लगेच पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी जातो, असं म्हणत पत्रकारांचीच फिरकी घेतली.

समाजवादी पक्षाच्या नेत्या जुही सिंह यांनी म्हटलं की, विरोधकांच्या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अखिलेश यादव असावे. सपाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना पंतप्रधानपदी पाहतो. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या सर्व क्षमता असल्याचंही म्हटलं. त्यामुळे एकंदरीतच पंतप्रधानपदासाठी आता हळूहळू नावं समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

Priyanka Gandhi: जेपी नड्डांच्या पत्राला प्रियंका गांधींचं उत्तर; म्हणाल्या, चुकीच्या भाषेचा वापर...

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

SCROLL FOR NEXT