corona death sakal
देश

देशातील कोरोना रुग्णसंख्या घटली, पण मृत्यूचं तांडव सुरुच

सकाळ डिजिटल टीम

भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचं स्पष्ट होतंय. मात्र, मृत्यू होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या चोवीस तासात देशात 1 लाख 27 हजार 952 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

तर 2 लाख 30 हजार 814 रुग्ण बरे झाले आहेत. मृतांचा आकडा 1 हजार 59 वर गेला आहे. देशात सध्या 13 लाख 31 हजार 648 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत भारतात 5 लाख 01 हजार 114 रुणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 7.98 टक्क्यांवर गेला आहे. (India Corona Update)

महाराष्ट्रात तिसरी लाट ओसरली!

राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांसह (corona new patients) मृत्यूचा आकडा (corona deaths) कालच्या तुलनेत किंचित खालावला. आज 13,840 नवीन रुग्ण तर 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,42,940 इतका झाला आहे. आज राज्यात एकाही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची (no omicron patient) नोंद झाली नाही. राज्यातील मृत्यूदर 1.83 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मंडळात मृत्यूंची नोंद झाली नाही.ठाणे 21,नाशिक 3,पुणे 29,कोल्हापूर 5,औरंगाबाद 4 ,लातूर 9,अकोला 6,नागपूर 4 मृत्यू नोंदवले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

Will Jacks Video: RCB चा शतकवीर मुंबई इंडियन्सने घेतला अन् आकाश अंबानी बंगळुरूच्या संघमालकांना थँक्यू म्हणून आला

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT