India Defense Exports 
देश

संरक्षण निर्यातीत भारताचे पाऊल पुढे

आफ्रिकी देशांबरोबरील व्यवहारांत वाढ

सकाळ वृत्तसेवा

जोहान्सबर्ग : संरक्षण साहित्य उत्पादनात स्वदेशीवर अधिक भर देण्याबरोबरच भारत या क्षेत्रातील एक प्रमुख निर्यातदार देश म्हणूनही उदयाला येत आहे. मॉरिशस, मोझांबिक आणि सेशेल्स या देशांनी २०१७ ते २०२१ या कालावधीत त्यांच्या नौदल, लष्कर आणि हवाई अशा तिन्ही दलांसाठी भारताकडून संरक्षण खरेदी केली असल्याचे ‘इंडिया एक्झिम बँके’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

आफ्रिका खंडातील दक्षिणेकडील देश आणि भारत यांच्यातील वाढती भागीदारी या विषयावर आयोजित केलेल्या एका परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

अहवालानुसार, २०१७ ते २०२१ या कालावधीत भारताच्या एकूण संरक्षण निर्यातीपैकी ६.६ टक्के शस्त्र निर्यात मॉरिशसला, पाच टक्के मोझांबिकला आणि २.३ टक्के सेशेल्सला केली होती. भारत आणि आफ्रिकी देशांमध्ये सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.

या अहवालात संरक्षण निर्यातीबाबतच्या सद्यस्थितीची माहिती देण्याबरोबरच भविष्यातील संधींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हवाई ड्रोनबरोबरच पाण्यातील ड्रोनच्या उत्पादनातही भारत आणि आफ्रिकी देश पुढाकार घेऊ शकतात, असे अहवालात सुचविण्यात आले आहे.

भारताची संरक्षण निर्यात

(कोटी रुपयांमध्ये)

१५०० - २०१५-१६

१२,००० - २०२१-२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT