नवी दिल्ली : गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात चिनी सैन्याकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर भारत संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पावले उचलत आहे. भारताने पायाभूत विकासाबरोबरच जवळपास ३ हजार ४०० किलोमीटर लांबीच्या सीमेवर सैन्य तैनाती वाढवली आहे. दुसरीकडे सैन्याने अरुणाचल प्रदेशातही (Arunachal Pradesh) नियंत्रण रेषेवर रात्रंदिवस टेहळणी आणखीन वाढवली आहे. त्यासाठी रिमोट ऑपरेटेड विमानेही तैनात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलचे लाँग एंड्युरन्स ड्रोनचा एक मोठा ताफा पर्वतीय भागात, नियंत्रण रेषेवर २४ तास लक्ष ठेवून आहे. येथून ते कमांड आणि नियंत्रण केंद्रांवर जरुरी डेटा आणि छायाचित्रे पाठवते. ड्रोनबरोबरच भारतीय सैन्याची (Indian Army) अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकाॅप्टर (एएलएच) रुद्रचे वेपन सिस्टम इंटिग्रेटेड (डब्ल्यूएसआय) व्हेरिएंटही तैनात करण्यात आले आहे. त्याने या क्षेत्रात भारताची सामरिक मोहिमांना अधिक ताकद मिळत आहे. सैन्याने या वर्षी याच भागात एक स्वतंत्र विमान ब्रिगेडची सुरुवात केली आहे. त्याने संवेदनशील भागांत सज्जता वाढवली जाऊ शकते.
या व्यतिरिक्त भारतीय सैन्याने इस्त्रायलकडून हेराॅन टीपी ड्रोन्सचा एक मोठा ताफा भाडेतत्त्वावर घेत आहे. जे ३५ हजार फुट उंचीवरुन जवळपास ४५ मिनिटांपर्यंत काम करु शकते. हेराॅन टीपी ड्रोन एक विस्तारित रेंजसाठी ऑटोमॅटिक टॅक्सी-टेकऑफ आणि लॅडिंग (एटीओएल) आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन (सॅटकाॅम) सिस्टमने सज्ज आहे. सुरक्षेचा मुद्दा विचारत घेऊन अरुणाचल प्रदेशात अतिरिक्त रस्ते, पुल आणि रेल्वे सारख्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. या व्यतिरिक्त तवांगला रेल्वे जाळ्याशी जोडण्याचेही काम सुरु आहे. गेल्या वर्षी ५ मेपासून पँगाँग क्षेत्रात भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान झालेल्या झटपटीनंतर दोन्ही बाजूंकडून हळूहळू हजारो सैन्य आणि शस्त्रांसह तैनाती वाढवली होती. त्यानंतर १५ जून रोजी गलवान खोऱ्यातील घातक कारवाईनंतर तणाव आणखीन वाढला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.