देश

Hardeep Singh Nijjar: भारताची मोठी कारवाई! टॉपच्या कॅनडियन अधिकाऱ्याची केली हाकालपट्टी

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी खलिस्तानवादी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा ठपका भारतावर ठेवला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी खलिस्तानवादी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्या प्रकरणात भारतावर केलेल्या आरोपांमुळं खळबळ उडाली असून भारतानंही ते गांभीर्यानं घेतलं आहे. कॅनडानं भारतीय उच्चाधिकाऱ्याला हटवल्यानंतर आता भारतानंही या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. त्यानुसार भारतातील कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्याची हाकालपट्टी करण्यात आली आहे. (India expels top Canadian diplomat as Trudeau row escalates)

कॅनडाच्या उच्चायुक्तांना समन्स

भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांना आज भारतानं समन्स पाठवलं आणि भारतातील कॅनडाच्या वरिष्ठ उच्चाधिकाऱ्याची भारतातून हाकालपट्टी केल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर हाकालपट्टी केलेल्या अधिकाऱ्याला पाच दिवसात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

भारतविरोधी कारवायांना पाठिंबा

भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांना पाठिंबा असल्याबद्दल भारत सरकारनं चिंताही या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

कॅनडाच्या पंतप्रधानांनी काय केलाय आरोप?

कॅनडाची राजधानी ओटावा इथल्या त्यांच्या ससंदेत अर्थात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं की, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येतील भारताच्या संभाव्य सहभागाच्या आरोपांची चौकशी करत आहेत. पण या कार्यात भारतीय अधिकाऱ्यांकडून अडथळा आणला जात आहे.

एखाद्या कॅनडाच्या नागरिकाच्या कॅनडाच्याच भूमीवर झालेल्या हत्येमध्ये जर इतर कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. हा प्रकार आमच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे, जे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हे मूलभूत नियमांच्या विरोधात आहे, असंही ट्रुडो यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT