कोची : आजच्याच दिवशी म्हणजे ३० जानेवारी २०२०ला भारतात पहिला कोरोना (India First Corona Patient) रूग्ण आढळून आला होता. केरळमधील (Kerala) त्रिशूरची एक तरूण महिला आपले लहानपणाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन वुहानच्या वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College In Wuhan) जाते. मात्र न भुतो ना भविष्यती अशी गोष्ट घडते. चीनमध्ये एक विषाणू धुमाकूळ घालतो. ती तरूणी कशीबशी या नव्या विषाणूचा विस्फोट झालेल्या वुहानमधून भारतात परतते. मात्र तिला नव्या विषाणूची (Coronavirus) लागण होते. ती भारतातील पहिली कोरोना बाधित रूग्ण ठरते. (India First Corona Patient wanted to return Wuhan)
भारताच्या पहिल्या कोरोनाबाधित रूग्ण होण्याच्या या घटनेला आता २ वर्षे उलटी आहेत. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. आता मात्र या तरूण महिलेला पुन्हा एकदा वुहानला (Wuhan) जायचं आहे. या ध्येयवेड्या मुलीचे वडील सांगतात की, 'आता कोरोनावर नियंत्रण मिळवता येते असा आमचा विश्वास आहे. मात्र माझ्या मुलीचे करियर मात्र अधांतरी राहिले आहे.
तो अनिश्चिततेचा काळ होता. त्यावेळी ती वुहानमधून कशीबशी भारतात परतली होती. ती घरी पोहचल्यानंतर तिची आठवड्याभराने कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली. तिचे वडील सांगतात की तिला तो काळ आठवायचा देखील नाही. गेल्या दोन वर्षापासून वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी घरातूनच अभ्यास करत आहेत. तिने गेल्या डिसेंबर महिन्यातच आपले एमबीबीएस पूर्ण केले ती परीक्षा देखील पास झाली. मात्र आता तिला वुहानच्या महाविद्यालयात परत जावेच लागणार आहे. चीनमध्ये एमबीबीएस (MBBS) पूर्ण केल्यानंतर रूग्णालयातच ५२ आठवड्यांची इंटरनशिप करणे बंधनकारक आहे. तरच त्या विद्यार्थ्याला पदवी मिळते.
अजूनही कोरोनाची महामारी (Pandemic) संपूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे निर्बंधही संपलेले नाहीत. तिचे वडील म्हणाला की, 'तिला चीनला जावेच लागणार आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी हा विषयावर चीनच्या (China) संबंधित प्रशासनाशी चर्चा करावी. हा फक्त माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर चीनमध्ये शिकणाऱ्या शेकडो भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.
ते पुढे म्हणाले की, 'या वैश्विक महामारीचा (Global Pandemic) प्रत्येकावर परिणाम झाला आहे. माझी मुलगी काही वेगळी नाही. ज्यांना कोरोनाची लागण झाली होती अशा इतरांप्रमाणे माझी मुलगीही त्यातून सावरत पुढे जात आहे. माझ्या मुलीला दोनवेळा कोरोनाची लागण झाली होती. आम्हाला एकदा कोरोनाची लागण झाली होती. माझ्या पत्नीला आणि आईला तर जुलै २०२० मध्ये न्यूमोनिया झाला होता.'
भारतातील पहिल्या कोरोना रूग्णावर उपचार करणारे डॉक्टर एमए अँड्र्यू यांनी सांगितले की, 'डॉक्टरांसाठी ती पेशंट क्रमांक एक (Patient One) होती. त्यावेळी या विषाणूबाबत फारशी माहिती नव्हती. त्यावेळी त्याला कोरोना हे नाव देखील देण्यात आले नव्हते. ती तरूण होती तिला सौम्य लक्षणे होती. त्यामुळे ती लवकर बरी देखील झाली. आपल्यासाठी तो शिकण्याचा काळ होता.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.