covid vaccin 
देश

लसीकरण कसं होणार? केंद्र सरकारने राज्यांना ड्राफ्ट पाठवून दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोना व्हॅक्सिन लवकरच उपलब्ध होणार आहे. अमेरिकेने फायजरच्या व्हॅक्सिनला परवानगी दिली असून त्याचा डोस 24 तासांच्या आतच दिला जाणार आहे. दरम्यान, भारतातही कोरोना व्हॅक्सिनच्या लसीकरणाची तयारी केली जात आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियमावली राज्यांना पाठवली आहे. लसीकरणाची मोहिम कशा पद्धतीने केली जाईल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला एका केंद्रावर एका दिवसात 100 लोकांनाच कोरोनाची लस दिली जाणार आहे. काही काळानंतर हे प्रमाण वाढवण्यात येईल असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ड्राफ्टमध्ये असं म्हटलं आहे की, एका लसीकरण केंद्रावर एक गार्ड असेल तसंच त्याच्यासोबत आणखी चार लोक असतील. लसीकरण केंद्रावर तीन खोल्या तयार करण्यात येतील. यामधील एक वेटिंग रूम असणार आहे. तर इतर खोल्यांमध्ये लसीकरण आणि तपासणी केली जाईल. गरज पडल्यास काही सरकार काही दिवसांमध्ये कम्युनिटी हॉल आणि तंबूची व्यवस्थाही करणार आहे. 

राज्यांना देण्यात आलेल्या ड्राफ्टनुसार ज्या व्यक्तीला कोरोना व्हॅक्सिन दिले जाईल त्याला कमीत कमी 30 मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात येईल. कोरोना व्हॅक्सिन लावण्यात आल्यानंतर जर काही गंभीर परिणाम दिसले तर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येईल. कोणत्या रुग्णालयात दाखल करायचा याचा निर्णय संबंधित राज्य सरकारचा असेल. 

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी गेल्या 24 तासात 30 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 98 लाख 26 हजार 775 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासात कोरोनामुळे 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 1 लाख 42 हजार 628 इतका झाला आहे. देशात सध्या 3 लाख 59 हजार 819 कोरोनाचे रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT