कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट ChatGPT सध्या नोकर्या बळकावण्याची भीती असतानाच, भारतात अंदाजे ४५,००० एआय-संबंधित नोकर्या रिक्त आहेत, असे टेक स्टाफिंग फर्म टीमलीज डिजिटलच्या अहवालात म्हटलं आहे.
एआय सेक्टरमध्ये काम केल्याचा पगार दरवर्षी १० ते १४ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकतो, तर अधिक अनुभव असलेले उमेदवार त्या पगारात दुप्पट वाढ करतात, असं अहवालात नमूद केलं आहे.
हेल्थकेअरपासून रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंगपर्यंतच्या उद्योगांचा समावेश असलेल्या, या रिक्त पदांमुळे देशातील वाढत्या एआय मार्केटला चालना मिळेल, या मार्केटने गेल्या वर्षी १२.३ अब्ज डॉलर्स कमाई केली आणि २० टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढ अपेक्षित आहे.
२०२५ पर्यंत ७.५ अब्ज डॉलर्स वाझ होईल. AI-च्या माध्यमातून मिळालेला महसूल २०२५ पर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये ४५० - ५०० अब्ज डॉलर्स इतकं योगदान देईल, जो देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याच्या १० टक्के असेल.
एआयच्या भीतीने आणि प्रभावामुळे कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांचे कौशल्य वाढवणे सुरू केले आहे. 'एआय हे तुलनेने नवीन क्षेत्र आहे आणि कुशल व्यावसायिकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. पण एआयमध्ये निपुण होण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाला वेळ लागू शकतो,' असं टीमलीज डिजिटलचे सीईओ सुनील चेम्मनकोटील म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.