Operation Ajay 
देश

Operation Ajay: इस्त्राइलमधील भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय'; एस जयशंकर यांची माहिती

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इस्त्राइल आणि हमास संघटनेमध्ये तुंबळ युद्धाला तोंड फुटले आहे. संघर्षात अनेकांचा जीव गेला असून अनेक जण जखमी झाले आहे. अनेकांना बेघर व्हायला लागले आहे. सध्या संघर्ष थांबण्याचे चिन्ह नाहीत. यापार्श्वभूमीवर भारत सरकारने इस्त्राइलमधील भारतीयांना परत आणण्यासाठी अजय ऑपरेशनची घोषणा केली आहे. युद्ध प्रदेशातील १८ हजार भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात येणार आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी 'एक्स'वर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी ऑपरेशन अजय लॉन्च करण्यात आले आहे. एक विशेष विमान आणि इतर सेवा यांची सोय करण्यात आली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध आहोत.' (India has launched Operation Ajay to facilitate the return of its citizens from Israel)

हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळच्या सुमारास गाफील असलेल्या इस्त्राइलवर भीषण हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की सुरुवातीला इस्त्राइलला सावरायला वेळ लागला. त्यानंतर इस्त्राइलने आक्रमक पवित्रा घेतला असून कठोर प्रतिहल्ला सुरु केला आहे. या हल्ल्यात १२०० दहशतवादी ठार झाल्याचे इस्त्राइलने सांगितले आहे.

माहितीनुसार, जवळपास १८ हजार भारतीय इस्त्राइलमध्ये राहत आहेत. युद्धाला तोंड फुटले असल्याने तेथील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारतीयांना परत आणण्यासाठी भारताकडून ऑपरेशन अजय लॉन्च करण्यात आलंय. भारतात परत येऊन इच्छिणारे नागरिक याच्या माध्यमातून परत येऊ शकतात.

इस्त्राइलमधील भारतीय दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांनी भारतात परत येण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यांना पहिल्या विमानात बसवले जाईल. आज हे विशेष विमान भारताकडे रवाना होईल. त्यानंतर इतर भारतीयांना देखील परत आणता येईल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT