India is becoming a country of old people esakal
देश

India Country Of Old People : भारत बनतोय वृद्धांचा देश, जाणून घ्या तरुणांची संख्या का कमी होतेय?

भारताला तरुणांचा देश म्हटले जाते

सकाळ डिजिटल टीम

India Country Of Old People : भारताला तरुणांचा देश म्हटलं जातं, परंतु शतकाच्या अखेरीस तो वृद्ध लोकांचा देश म्हणून गणला जाऊ शकतो. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNPF) च्या 'इंडिया एजिंग रिपोर्ट 2023' मध्ये हा दावा करण्यात आला आहे.

भारताला तरुणांचा देश म्हटले जाते, पण शतकाच्या अखेरीस तो वृद्धांचा देश बनण्याची शक्यता आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNPF) च्या 'इंडिया एजिंग रिपोर्ट 2023' मध्ये हा दावा करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, परंतु बदलत्या आकडेवारीवरून हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, सध्या 60 वर्षांवरील वृद्धांची संख्या सुमारे 15 कोटी आहे. हे देशाच्या लोकसंख्येच्या 10.5 टक्के आहेत. 2021 मध्ये, 60 वर्षांवरील वृद्ध लोकांची लोकसंख्या 10.1 टक्के होती, जी 2036 पर्यंत 15 टक्के आणि 2015 पर्यंत 20.8 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. या शतकाच्या अखेरीस वृद्धांची संख्या 36 टक्क्यांहून अधिक होईल, असे अहवालात म्हटले आहे.

हे नेमकं कसं घडलं?

देशातील तरुणांची संख्या कमी आणि वृद्धांची संख्या कशी काय वाढली? या प्रश्नाचे उत्तर अहवालात देण्यात आले आहे. खरं तर, 1961 पासून भारतातील वृद्धांची लोकसंख्या वाढली आहे. 2001 पर्यंत ती हळूहळू वाढली असली तरी, तेव्हापासून लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. आकडेवारी दर्शवते की 2010 पासून, 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे आणि वृद्ध लोकांची संख्या वाढली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भारत वृद्धांचा देश होईल, असे या अहवालात म्हटले आहे.

भारतात तरुणांची संख्या किती?

आतापर्यंत असे मानले जात होते की जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनशी तुलना केल्यास भारतातील तरुणांची संख्या तिथल्या तुलनेत 47 टक्के अधिक आहे. सध्या देशातील 138 कोटी लोकसंख्येपैकी 25 कोटी तरुण आहेत ज्यांचे वय 15 ते 25 वर्षे आहे.सोप्या भाषेत सांगायचं तर 18 टक्के लोकसंख्या तरुणांची आहे.तर चीनमध्ये केवळ 17 कोटी तरुण आहेत जे संयुक्त राष्ट्रांच्या मानकांमध्ये बसतात. अशाप्रकारे पाहिले तर चीनच्या लोकसंख्येपैकी केवळ 12 टक्के तरुण लोकसंख्या आहे.

भारतात कोणाला तरुण म्हटलं जातं?

भारतात, 2014 पर्यंत, 13 ते 35 वर्षे वयोगटातील लोकांना तरुणांच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते, परंतु 2014 मध्ये राष्ट्रीय युवा धोरणाने हे मानक बदलले. नवीन धोरणानुसार, ज्यांचे वय 15 ते 30 वर्षे आहे त्यांनाच सरकारी रेकॉर्डमध्ये तरुण मानले जाईल. त्या अर्थी बघायचं तर देशातील 37 कोटींहून अधिक लोकसंख्या तरुण आहे.त्याच वेळी, चीनची युवा विकास योजना 35 वर्षांपर्यंतच्या लोकांना तरुण मानते. अगदी दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये, 35 वर्षांपर्यंतच्या लोकांना तरुण म्हटले जाते. अशा प्रकारे पाहिले तर भारतात सुमारे 48 कोटी लोकसंख्या तरुण आहे.

तरुणांची संख्या का कमी होते आहे?

केंद्र सरकारच्या 'युथ इन इंडिया 2022' या अहवालात तरुणांबाबतही हेच म्हटलं आहे. अहवालात म्हटलंय की, भारत आता वृद्धांचा देश बनत चालला आहे. 2036 पर्यंत देशातील केवळ 34.55 कोटी लोकसंख्या तरुण असेल. येत्या 15 वर्षांत तरुणांची संख्या कमी होईल आणि वृद्धांची लोकसंख्या वाढेल. आता याचे कारण जाणून घेऊया.

तरुणांची संख्या कमी होण्यामागे तीन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.

1. घटता प्रजनन दर

देशातील प्रजनन दर वर्षानुवर्षे घसरत आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर, एक स्त्री सरासरी किती मुलांना जन्म देते याला प्रजनन दर म्हणतात. 2011 मध्ये प्रजनन दर 2.4 होता, जो 2019 मध्ये 2.1 वर आला. म्हणजे त्यात आणखी घट झाली.

2. मृत्यू दर

भारतात मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. हे मृत्यू दरावरून समजू शकते. मृत्यू दर म्हणजे प्रति 1 हजारामागे होत असलेल्या मृत्यूची संख्या. 2011 मध्ये हा दर 7.1 होता. 2019 मध्ये हा मृत्यू दर 6.0 पर्यंत कमी झाला.

3. अर्भक मृत्यू दर

अर्भक मृत्यू दर म्हणजेच नवजात बालकांचा मृत्यू दर. यावरून 1000 बालकांमागे किती नवजात बालकांचा मृत्यू झाला याची माहिती मिळते. त्याची स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे, पण फारसा बदल झालेला नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT