देश

Sarojini Naidu Birth Anniversary : कोण होत्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल? जन्मदिनी साजरा होतो 'राष्ट्रीय महिला दिन'

कोण होत्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल?

Aishwarya Musale

भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे.

13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला. चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे त्यांनी शिक्षण घेतले. त्या 12 व्या वर्षापासूनच कविता लिहायच्या. सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर त्यांनी महिलांच्या हक्कासाठी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे.

सरोजिनी नायडू पहिल्यांदा 1914 साली महात्मा गांधींना भेटल्या. महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी सरोजिनी नायडू या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या. आणि त्यांची विचारसरणी पुर्णपणे बदलुन गेली. त्यानंतर त्या 1925 साली कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या. 1928 साली ब्रिटीश सरकारने प्लेगच्या साथीदरम्यान सरोजिनी नायडू यांनी केलेल्या कामगिरीबद्दल ‘कैसर ए हिंद’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

2 मार्च, 1949 रोजी सरोजिनी नायडू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर सरोजिनी नायडू यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधत 13 फेब्रुवारी 2014 सालापासून देशात राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.

तसेच त्यांच्या कादंबऱ्या आणि कविता संग्रह देखील फार प्रसिध्द आहेत. दी बर्ड ऑफ टाइम: साँग ऑफ लाइफ, डेथ अँड दी स्प्रिंग, दी ब्रोकन विंग: साँग ऑफ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, मुहम्मद जिन्नाःअन एम्बेसिडर ऑफ यूनिटी, दी सेप्ट्रेड फ्लूट: साँग्स ऑफ इंडिया, अलाहाबाद: किताबिस्तान, दी इंडियन वीवर्स, फीस्ट ऑफ यूथ, दी मॅजिक ट्री एंड दी विजार्ड मास्क.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT