Luv Aggarwal ANI
देश

देशातील पॉझिटिव्हिटी रेट 17.75 टक्क्यांवर : आरोग्य मंत्रालय

27 जानेवारीपर्यंत भारतात कोरोनाच्या 22,02,472 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधित (Covid 19 In India ) होण्याचा पॉझिटिव्हिटी दर 17.75 इतका नोंदविण्यात आला असून, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये 3 लाखांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. (Covid Latest News In Marathi) दरम्यान, आंध्र प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये 1-2 लाख सक्रिय रूग्ण असून, देशातील 551 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5% पेक्षा जास्त आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. (Health Ministry Latest News In Marathi)

27 जानेवारीपर्यंत भारतात कोरोनाचे (Covid 19 Active Cases In India) 22,02,472 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली असून, 11 राज्यांमध्ये 50,000 हून अधिक सक्रिय रूग्णांची नोंद करण्यात आली आहेत. (Maharashtra Covid Active Cases ) महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये ३ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण असून, गेल्या एका आठवड्यात देशात दररोज सरासरी 3 लाख रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत देशातील 95 टक्के लोकांना (Total Covid 19 Vaccination In India) कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून 74 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. याशिवाय देशातील 97 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येला प्रिकॉशनरी (Booster Dose) डोस देण्यात आल्याचे यावेळी आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) स्पष्ट करण्यात आले.

कोविशील्ड आणि कोवॅक्सीन बाजारात होणार उपलब्ध

दरम्यान, कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात 'संजीवनी' ठरलेल्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनबाबतही चांगली बातमी समोर आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या देशातील दोन कोरोना प्रतिबंधक लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. या दोन्ही लसींच्या निर्मिती कंपन्या सीरम (Serum Institue of India) आणि भारत बायोटेकनं (Bharat Biotech) यासाठी परवानगी मागितली होती. (DCGI grants conditional market approval for Covishield and Covaxin)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT