कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक छायाचित्र प्रतिकात्मक छायाचित्र
देश

कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय पण मृत्यूनं चिंता वाढवली

नामदेव कुंभार

मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित (COVID19) रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत असल्यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झालं असले असली तरीही दररोज होणाऱ्या कोरोना मृत्यूनं चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry) दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी राज्यात 4 हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन आठवड्यांपासून देशात दररोज चार हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूमुळे चिंतेत वाढ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देशात तीन लाख 11 हजार 170 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर चार हजार 77 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत तीन लाख 62 हजार हजार 437 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहा:कार माजवला आहे. आरोग्य व्यवस्थेचा उडालेल्या बोजवारामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरीही मृत्यूनं चिंता वाढवली आहे. शनिवारी एकट्या महाराष्ट्रात 900 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यानं चिंता वाढवली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Total cases) दोन कोटी 46 लाख 84 हजार 077 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत दोन कोटी 07 लाख 95 हजार 335 जणांनी कोरोनावर (Total discharges) मात केली आहे. आतापर्यंत दोन लाख 70 हजार 284 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू (Death toll) झालाय. देशात सध्या 36 लाख 18 हजार 458 रुग्ण उपचाराधीन (Active cases) आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT