विविध निर्बंध लावले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक नवे रेकॉर्ड तयार करत आहे. भारतात रविवारी कोरोना महामारीनं आणखीन एक रेकॉर्ड गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसांत ६२ हजार ७१४ नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ कोटी १९ लाख ७१ हजार ६२४ वर पोहचलीय. कोरोना संक्रमणामुळे गेल्या २४ तासांत ३१२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या १ लाख ६१ हजार ५५२ वर पोहचलीय.
महाराष्ट्र, पंजाब आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यातून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. नवीन कोरोना रुग्णांपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राताली आरोग्य मत्रालयानं शनिवारी रात्री दिलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत राज्यात ३३ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या २४ तासांत २८ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात एक कोटी १३ लाख २३ हजार ७६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या चार लाख ८६ हजार ३१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.