india vs modi sakal
देश

INDIA: देश पातळीवर मोदींना शह देण्यासाठी 'इंडिया' लागली पुन्हा कामाला; जागा वाटपावर होणार निर्णय?

India vs Modi : येत्या १९ डिसेंबरपासून दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरात सहभागी होणार आहेत. यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

तब्बल साडेतीन महिन्यांनंतर येत्या मंगळवारी होणारी ‘इंडिया’ आघाडीची बैठक कितपत यशस्वी ठरणार यावर आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. या बैठकीत सर्वात कठीण असलेले जागा वाटपाचे सूत्र व सर्वपक्षीय सभांचा कार्यक्रम ठरविणे आहे. या दोन मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाटणा, बंगळूर व मुंबईतील बैठकांनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठकच झाली नाही. या दरम्यान साडेतीन महिने लोटले आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसने पुढाकार घेऊन आता येत्या १९ डिसेंबरला इंडिया आघाडीतील २८ पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली आहे.

बहुतेक नेत्यांनी सध्यातरी येण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु वेळेवर नेमके किती नेते उपस्थित राहतात. यावरच या बैठकीचे यश स्पष्ट होणार आहे. काँग्रेसच्या एकूणच भूमिकेबद्दल या आघाडीतील इतर नेत्यांमध्ये तेवढाचा विश्वास नाही.

जागा वाटप मुख्य मुद्दा

येत्या मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्याने दोन मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा सोडविणे अत्यंत आवश्यक आहे. प्रामुख्याने उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली व पंजाब या राज्यांमध्ये जागावाटपाची समस्या आघाडीच्या घटकपक्षांमध्ये आहे. उत्तरप्रदेश वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये घटक पक्षांची राज्ये सरकारे आहेत.

यात काँग्रेसची भूमिका दुय्यम आहे. उत्तरप्रदेशातही काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यावी लागणार आहे. या चार राज्यांच्या जागा वाटपावर आघाडीची नाव मार्गी लागणार आहे. मुंबईतील बैठकीत सर्वपक्षीय बैठक घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या नकारामुळे भोपाळ येथे आयोजित ही सभाच रद्द झाली. त्यानंतर आघाडीला मुहूर्त मिळू शकला नाही. ही बैठक कुठे होणार यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा तिढा एवढ्यात सुटणार नाही परंतु विरोधकांच्या जाहीरसभेची तारीख व स्थळ ठरणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र व बिहारचे जागावाटपाचे सूत्र ठरले

महाराष्ट्र व बिहारमध्ये आघाडीला जागावाटप करावे लागणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये घटकपक्षात जवळपास एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घटकपक्ष आहेत.

या घटकपक्षांच्या नेत्यांच्या यासंदर्भात चर्चा झाल्या आहेत. यात एकमत झाल्याचे समजते. तसेच बिहारमध्येही जेडीयू, आरजेडी व काँग्रेसमध्ये आघाडी आहे. या राज्यातही या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

केजरीवाल अनुपस्थित

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येत्या मंगळवारी होणाऱ्या आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री केजरीवाल येत्या १९ डिसेंबरपासून दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरात सहभागी होणार आहेत. यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT