india to consider proposal to delay import licence order for laptops tablets source sakal
देश

लॅपटॉप आणि इतर उपकरणे आयात परवान्यांसाठी मुदतवाढ मिळणार...

कंपन्यांना परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल आणि आयातीत कोणतीही समस्या येणार नाही याची खात्री देण्याचा प्रयत्न केला जाईल,असेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सरकार लॅपटॉप आणि इतर उपकरणे आयातीकरिता आवश्यक परवान्यांसाठी अर्ज करण्यासाठी कंपन्यांना अधिक वेळ देण्याची शक्यता आहे, असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

कदाचित एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता असून, याबाबत डीजीएफटीची अधिसूनचना लवकरच अपेक्षित आहे, असेही सूत्रांनी सांगितले. लॅपटॉप, टॅब्लेट आणि विशिष्ट प्रकारच्या संगणकांवर आयात निर्बंध लादण्याची आणि वैध परवान्यांमधूनच त्यांची आयात करण्याची परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खळबळ माजली होती.

त्यांनतर आज हा खुलासा करण्यात आला आहे. कंपन्यांना परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल आणि आयातीत कोणतीही समस्या येणार नाही याची खात्री देण्याचा प्रयत्न केला जाईल,असेही सूत्रांनी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने लॅपटॉप आदी उत्पादनांच्या आयातीवर काल तत्काळ प्रभावाने निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामुळे उत्पादने जिथून येत आहेत त्या ठिकाणांवर बारीक नजर ठेवता येईल, असेही माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

तंत्रज्ञान कंपन्यांनी थांबवली आयात

अॅपल, सॅमसंग, एचसीएल आदी कंपन्यांनी भारतात करण्यात येणारी लॅपटॉप आणि टॅब्लेटची आयात थांबवली आहे. सरकारने गुरुवारी (ता. ३) छोट्या टॅब्लेटपासून ऑल-इन-वन पीसीपर्यंत काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आयात करण्यासाठी परवाना अनिवार्य केला. त्यामुळे या कंपन्यांनी आयात थांबवण्याचा निर्णय घेतला.

आता भारतात शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, सणासुदीचा खरेदीचा हंगामही जवळ आल्याने या उपकरणांची खरेदी वाढणार आहे. अशावेळी परवाने मिळण्यास किती वेळ लागेल हे अस्पष्ट आहे. त्यामुळे अब्जावधी-डॉलरच्या व्यापारात व्यत्यय येत आहे, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT