India - Usa Friendship : नुकताच जून 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तीन दिवसीय अमेरिका दौरा झाला होता. यावेळी अमेरिकन कंपनी GE आणि भारतीय कंपनी HAL यांच्यात करार झाला होता. या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
भारतासोबतच्या जेट इंजिन (GE-F414) तांत्रिक कराराची माहिती जो बायडन सरकारने अमेरिकन संसदेला दिली आहे. हा करार कोणत्याही प्रकारे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताच्या विरोधात नसल्याने अमेरिकन संसद या कराराला लवकरच मान्यता देईल अशी अपेक्षा केली जात आहे.
यूएस स्टेट डिपार्टमेंटने एचएएलद्वारे उत्पादित केल्या जाणार्या एलसीए मार्क II विमानासाठी GE-F414 इंजिन तंत्रज्ञान भारताकडे हस्तांतरित करण्याबाबत यूएस काँग्रेसला माहिती दिली आहे.
मात्र, या संपूर्ण व्यवहारावर मोदी सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परंतु GE-F 414 इंजिनचा वापर LCA MK II, AMCA मार्क I आणि ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर (TEDBF) ला उर्जा देण्यासाठी केला जाईल.
अमेरिकेवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या करारावर स्पष्टीकरण मागण्यासाठी अमेरिकन काँग्रेसकडे 30 दिवसांचा अवधी आहे. या महिन्याच्या अखेरीस त्याला मंजुरी मिळेल.दोन्हीही देश जवळचे मित्र असल्याने अधिसूचनेकडे केवळ औपचारिकता म्हणून पाहिले जात आहे.
F414 इंजिन भारतात आल्याने हवाई दल आणि नौदलाच्या लढाऊ विमानांना बळ मिळणार आहे. एलसीए तेजस एमके 2 ते एएमसीए लढाऊ विमाने बनवण्यात मदत केली जाईल. F414-INS6 आवृत्ती भारतासाठी तयार केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.