Nuclear Bomb esakal
देश

Nuclear Bomb: अण्वस्त्रांच्या शर्यतीत भारताचा पाकिस्तानवर विजय, चीनने तर जगाला घाबरवले! वाचा कुणाकडे किती अणुबॉम्ब?

Sandip Kapde

अण्वस्त्रांच्या संख्येत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे, तर चीनच्या अण्वस्त्रांच्या साठ्यातही वाढ झाल्याचा दावा स्वीडिश थिंक टँकने आपल्या अहवालात केला आहे. चीनच्या अण्वस्त्रांची संख्या जी गेल्या वर्षी जानेवारीत 410 होती, ती यावर्षी जानेवारीत 500 झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत जग दोन मोठ्या युद्धांचे साक्षीदार आहे, अशा परिस्थितीत स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (Stockholm International Peace Institute) आपल्या अहवालात म्हटले आहे की, अण्वस्त्रांनी सज्ज असलेले नऊ देश आणि त्यात भारत, पाकिस्तान आणि चीन यांचाही समावेश आहे. त्यांची अण्वस्त्रे वाढवत आहेत आणि त्यांचे आधुनिकीकरण करत आहेत.

अहवालानुसार, जगभरात 2,100 अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी बहुतांश रशिया आणि अमेरिकेकडे आहेत. सर्व रशियन आणि यूएस शस्त्रे उच्च ऑपरेशनल अलर्टवर आहेत आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या युद्ध प्रमुख प्रणालीसह वापरण्यासाठी तयार आहेत. काही अहवालांनुसार, चीनने प्रथमच आपली अण्वस्त्रे हाय ऑपरेशनल अलर्ट मोडवर ठेवली आहेत.

भारताकडे 172 अण्वस्त्रे आहेत

SIPRI अहवालानुसार भारताकडे जानेवारी 2024 पर्यंत 172 अण्वस्त्रे होती, जी पाकिस्तानच्या 170 अण्वस्त्रांपेक्षा 2 अधिक आहे. अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सातत्याने अण्वस्त्रांचा साठा वाढवत आहेत. SIPRI ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे मुख्य लक्ष्य भारत आहे, तर भारत चीनच्या संपूर्ण भूभागापर्यंत पोहोचू शकणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.

भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया अमेरिका आणि रशियासारख्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर अण्वस्त्रे बसवण्याच्या तयारीत असल्याचेही SIPRI अहवालात स्पष्ट झाले आहे. चीनबद्दल बोलताना SIPRI चे हॅनेस ख्रिश्चन म्हणाले की, या देशाने इतर कोणत्याही देशापेक्षा वेगाने अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे.

एकीकडे इस्राईल-हमासमध्ये युद्ध सुरू आहे. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेन. चीन आणि तैवानमधील तणावही शिगेला पोहोचला आहे. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंधही ताणले गेले आहेत.

दरम्यान, चीनसोबतचे संबंधही अनेक वर्षांपासून खराब होत आहेत. दुसरीकडे रशिया-उत्तर कोरियाचे अमेरिकेशी थेट वैर आहे. जगातील प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या देशाशी संघर्षात आहे. अशा परिस्थितीत, युद्ध केव्हा आणि कोठे सुरू होईल हे कोणालाही माहिती नाही. आजचे युग अणुऊर्जेचे आहे. असे म्हणतात की ज्याच्याकडे सर्वात जास्त अणुबॉम्ब आहेत तोच खरा सिकंदर आहे.

कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे?

रशिया-4380
अमेरिका-3708
चीन-500
फ्रान्स-290
UK-225
भारत-172
पाकिस्तान-170
इस्रायल-90
उत्तर कोरिया-50

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT