Latest Airways News: एअर इंडियामध्ये विलीनीकरण निश्चित झाल्याने देशातील तिसरी सर्वांत मोठी विमान कंपनी विस्तारा ११ नोव्हेंबर रोजी शेवटचे उड्डाण करणार आहे. विस्ताराची सर्व उड्डाणे १२ नोव्हेंबरपासून एअर इंडियाद्वारे चालवली जातील. त्यासाठीचे तिकीट आरक्षणही एअर इंडियाच्या वेबसाइटवरून केले जाणार आहे.
कंपनीच्या वेबसाइटवरून तीन सप्टेंबरपासून १२ नोव्हेंबर किंवा त्यानंतरच्या प्रवासासाठी तिकीट आरक्षण बंद होईल, असे कंपनीने म्हटले आहे. विस्तारा ११ नोव्हेंबरपर्यंत तिकीट नोंदणी आणि प्रवासासाठी विमानउड्डाण सुरू ठेवेल. एअर इंडिया-विस्तारा यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये विलीनीकरणाचा करार केला होता. या विलीनीकरणाला सप्टेंबर २०२३ मध्ये भारतीय नियामक स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) मंजुरी मिळाली. या वर्षाच्या सुरुवातीला सिंगापूरच्या स्पर्धा आणि ग्राहक आयोगाने (सीसीसीएस) विलीनीकरणाला मान्यता दिली.
या विलीनीकरणानंतर, एअर इंडिया समूह ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी देशांतर्गत विमान कंपनी आणि बाजारातील हिश्शाच्या बाबतीत सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय विमान कंपनी बनेल. या करारानुसार, सिंगापूर एअरलाइन्स सुमारे २०९६ कोटी रुपयांच्या थेट गुंतवणुकीसह एअर इंडिया समूहातील २५.१ टक्के हिस्सा मिळवेल, तर टाटा समूहाचा हिस्सा ७४.९ टक्के असेल. विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतरदेखील सिंगापूर एअरलाइन्स ५६६४ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया इंडिया आणि विस्तारा यांच्याकडे एकूण २१८ वाइडबॉडी आणि नॅरोबॉडी विमाने आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.