जपानचे उद्योगपती युसाकू मेझावा यांनी नुकतंच चंद्राच्या सफरीची घोषणा केली आहे. या सहलीसाठी काही जणांना निवडण्यात आलं आहे. यामध्ये काही युट्यूबर्स तसंच अभिनेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतातला एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहराही या सहलीला जाणार आहे.
पुढच्या वर्षी चंद्रावर सहल जाणार आहे, इलॉन मस्कच्या स्पेस एक्स रॉकेट्समधून हे सगळे चंद्रावर जाणार आहेत. यामध्ये आठ जणांचा समावेश आहे. अमेरिकेतून डीजे आणि निर्माता स्टीव्ह ऑकी, अमेरिकन युट्युबर टीम डॉड, झेक आर्टिस्ट येमी एडी, आय़र्लंडची फोटोग्राफर रिहाना अॅडम, ब्रिटीश फोटोग्राफर करिम लिया, अमेरिकन फिल्ममेकर ब्रेंडन हॉल आणि भारतीय अभिनेता देव जोशी तसंच साऊथ कोरियातला संगीतकार टॉप याचा समावेश आहे.
हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’
कोण आहे हा भारतीय अभिनेता?
चंद्रावर सहलीसाठी निवड करण्यात आलेल्या या भारतीय अभिनेत्याचं नाव आहे देव जोशी. देव जोशीला घराघरात बालवीर या नावाने ओळखलं जातं. याच नावाच्या मालिकेतून तो लोकप्रिय झाला होता. लहान मुलांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे. देवने २०हून अधिक गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने चंद्रशेखर या मालिकेमध्ये चंद्रशेखऱ आझाद यांची भूमिका साकारली होती.
मेझावा यांनी या प्रवासासाठी स्पेस एक्सच्या रॉकेटमधली प्रत्येक जागा खरेदी केली आहे. हे रॉकेट २०१८ पासून कार्यरत आहे. मेझावा यांनी ट्वीटरवरुन याची घोषणा केली असून त्यांच्या #dearMoon प्रोजेक्टसाठी करण्यात आलेल्या वेबसाईटवरुनही त्यांनी हे सांगितलं आहे. स्पेस एक्सच्या स्टारशिपला लाँच झाल्यापासून पृथ्वीवर परतण्यासाठी आठ दिवस लागतील. हे यान चंद्राच्या तीन फेऱ्या पूर्ण करेल. २०२३ मध्ये या फेरीचं नियोजन करण्यात आलं आहे, पण या यानाच्या चाचण्या होत असल्याने नियोजनात बदल होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.