नवी दिल्ली : भारतीय हवाई दल सप्टेंबरमध्ये जुन्या मिग-21 लढाऊ विमानांच्या उर्वरित चार स्क्वॉड्रनपैकी एक रिटायर करणार आहे. यासोबतच उर्वरित तीन स्क्वॉड्रन पुढील तीन वर्षांत 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने निवृत्त केल्या जातील अशी माहिती संरक्षण क्षेत्रातील सुत्रांकडून समोर आला आहे. गुरुवारी राजस्थानमध्ये मिग-21 हे दोन आसनी विमान कोसळले होते. या घटनेत या फायटर जेटचे दोन्ही पायलट ठार झाले. (indian air force iaf set to retire all 4 mig 21 squadrons by 2025)
दरम्यान एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वृत्तवाहिनीला सांगितले की, दोन महिन्यांत निवृत्त होणारे स्क्वॉड्रन हे श्रीनगरमधील 51 वे स्क्वॉड्रन आहे, ज्याला स्वॉर्ड आर्म्स असेही म्हणतात. हे तेच स्क्वाड्रन आहे ज्यामध्ये अभिनंदन वर्धमान हे 2019 साली विंग कमांडर होते. मिग-21 बद्दल सांगायचे झाल्यास, या विमानांचे अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. भारतातील सर्वात जास्त वेळ सेवा देणार्या विमानांमध्ये याची गणना केली जाते. अलिकडच्या वर्षांत अनेक मिग-21 विमाने कोसळली आहेत. म्हणूनच त्याला आता 'फ्लाइंग कॉफिन' असेही म्हणतात.
भारतीय हवाई दलाला हे विमान सोव्हिएत युनियनकडून म्हणजेच रशियाकडून 1963 साली मिळाले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या सहा दशकांमध्ये 400 हून अधिक मिग-21 विमाने कोसळली असून त्यात जवळपास 200 वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातांबद्दल बोलायचे झाले तर, मिग-21 इतर कोणत्याही लढाऊ विमानापेक्षा जास्त क्रॅश झाले आहे .मात्र, यामागे हे विमानही उर्वरित विमानांपेक्षा जास्त वेळ सेवा देत आहे हे देखील एक कारण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.