स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर भारतीय लष्कराची ताकद आता आणखी वाढलीये. लष्कराच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीच्या 12 ब्रिजिंग सिस्टिमचा समावेश झालाय. पश्चिमी सीमाभागातील ऑपरेशनवेळी भौगोलिक अडथळे पार करण्यासाठी या सिस्टिमचा वापर उपयुक्त ठरेल. शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टमच्या माध्यमातून छोटा पूल तयार करुन लष्करी टँक आणि लढावू वहानांना नदी किंवा नाले यासारख्या भौगोलिक अडथळ्यांची बाधा पार करणे सहज शक्य होणार आहे. (Indian Army Corps of Engineers troops demonstrate how the new 10 meter Short Span Bridging system watch video)
या 12 ब्रिजिंग सिस्टिम्सची किंमत जवळपास 492 कोटींच्या घरात आहे. डीआरडीओसोबत मिळून इंडियन आर्मी इंजिनिअर्सने या स्वदेशी बनावटीच्या सिस्टिमची डिझाईन तयार केलीय. लार्सन अँड टुब्रोने याचे उत्पादन केले आहे. या ब्रिजिंग सिस्टिम्स अर्थात आर्मीसाठी छोटा पूल म्हणून वापण्यास उपयुक्त असणारी ही नवी यंत्रणा पाकिस्तान लगतच्या सीमाभागात संचलनासाठी ठेवण्यात येणार आहेत. डीआरडीओ प्रमुख डॉ.जी, सतीश रेड्डी आणि सेना प्रमुख एमएम नरवणे यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा लष्कराकडे सुपूर्द करण्यात आलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.