Indian Army Sakal
देश

Indian Army Day 2023: भारतीय सैन्यासाठी चालू वर्ष असणार वैशिष्टपूर्ण; ताफ्यात सहभागी होणार खास शस्त्र

वर्ष २०२३ मध्ये देखील भारतीय सैन्याच्या ताफ्यात अनेक शस्त्रास्त्रांचा समावेश होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Army Day 2023: भारतात दरवर्षी १५ जानेवारीला सैन्य दिन साजरा केला जातो. याच दिवशी १९४९ साली फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल फ्रान्सिस बचर यांच्याकडून स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख म्हणून सुत्र स्विकारली होती. ब्रिटिश काळापासून ते आतापर्यंत भारतीय सैन्यात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. महासत्ता होण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासोबतच भारतीय सैन्य आधुनिक होत चालले आहे.

भारतीय सैन्याकडे अनेक आधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. सैन्याकडे बॅलेस्टिक मिसाइल, पिनाका मल्‍टी बॅरल रॉकेट सिस्‍टम, पृथ्वी मिसाइल यासोबतच सुखोई-३०, मिग-२१,, मिराज-२०००, मिग-२९ सारखे फायटर जेट देखील आहेत. वर्ष २०२३ मध्ये देखील भारतीय सैन्याच्या ताफ्यात अनेक शस्त्रास्त्रांचा समावेश होणार आहे. सरकारने या आधुनिक शस्त्रांच्या खरेदीसाठी कोट्यावधी रुपये मंजूर केले आहे. २०२३ मध्ये भारतीय सैन्याला मिळणाऱ्या अशाच घातक शस्त्रांविषयी जाणून घेऊया.

४ हजार कोटींच्या अँटी-टँक मिसाइलच्या करणार खरेदी

चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने ४ हजार कोटी रुपयांच्या Helina anti-tank guided missiles खरेदीला मंजूरी दिली आहे. डीआरडीओद्वारे या अँटी-टँक मिसाइल्सची निर्मिती केली जाईल. या थर्ड जनरेशन मिसाइल्सची रेंज जवळपास ७ किमी आहे. याद्वारे थेट लक्ष्यावर निशाणा साधता येतो. पुढील काही वर्षात या अँटी-टँक गाइडेड मिसाइल्स भारतीय शस्त्रास्त्राचा भाग असतील.

VSHORAD

भारतीय सैन्याकडे लवकरच VSHORAD क्षेपणास्त्रे पाहायला मिळेल. Very Short Range Air Defence System अर्थात VSHORAD ची निर्मिती देखील DRDO द्वारे केली जाईल. याद्वारे सैन्य खांद्यावरून क्षेपणास्त्र डागू शकतात. याचे वजन जवळपास २० ते २५ किलो असेल. जवळपास ६ किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्याची यात क्षमता असेल.

हेही वाचा: Amazon Sale: मस्तच! अर्ध्या किंमतीत मिळतेय फुल ऑटोमेटिक Washing Machine, ऑफर एकदा पाहाच

प्रोजेक्ट झोरावर

भारतीय बनावटचे झोरावर टँक लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. Project Zorawar प्रकल्पाअंतर्गत निर्मिती करण्यात येणाऱ्या टँकचं वजन सुमारे 25 टन असेल .हलक्या वजनाचे हे टँक उंच डोंगरावरून खिंडीपर्यंत जाण्यास सक्षम असतील. Project Zorawar अंतर्गत तयार केलेले हे हलके टँक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम ड्रोनने सुसज्ज असतील.

प्रोजेक्ट दुर्गा - II

मेड इन इंडिया अंतर्गत शस्त्रास्त्र तयार करण्यावर सरकारचा भर आहे. याच अंतर्गत DRDO नवीन टेक्नोलॉजीवर आधारित शस्त्र आणत आहे. DRDO सध्या डायरेक्ट-अ‍ॅनर्जी वेप्न्सवर काम करत आहे. DRDO सध्या Directionally Unrestricted Ray-Gun Array (DURGA) II वर काम करत आहे. याची क्षमता १०० किलोवॅट असेल. लेझरवर आधारित या शस्त्राचा वापर जमिन, आकाश आणि समुद्रातूनही करता येईल.

हेही वाचा: पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT