Jammu-Kashmir file photo
देश

उरी सेक्टरजवळ 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; मोठा शस्त्रसाठा हस्तगत

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) उरी येथील रामपूर सेक्टरमध्ये लष्कराने घुसखोरीचा मोठा कट उधळला. यावेळी लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खातमा केला. त्याचप्रमाणे, मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारूगोळाही जप्त केला.

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले, की एलओसीनजीक हथलंगा परिसरात संशयास्पद हालचाल दिसली. त्यानंतर, लष्कराच्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यात सात पिस्तुल, ७० हातबॉम्ब आदींचा समावेश आहे.
लष्कराच्या चिनार कॉर्प्स मुख्यालयात या कारवाईबद्दल ले.जनरल डी.पी.पांडे म्हणाले, की गेल्या काही दिवसांत एलओसीच्या दुसऱ्या बाजूच्या लाँच पॅडवर कारवायांत वाढ झाली होती. या वर्षी आतापर्यंत घुसखोरी झाली नव्हती. मात्र, लाँच पॅडवर थोड्या हालचाली सुरू झाल्या. पाकिस्तानी लष्कर आणि कमांडरना माहित असल्याशिवाय लाँच पडवर सक्रियता वाढू शकत नाही. आज लष्कराने घुसखोरीचा कट उधळला, यातून हे सिद्ध होते. उरी सेक्टरमध्ये १८ सप्टेंबरलाही दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव लष्कराने हाणून पाडला होता, असेही त्यांनी नमूद केले.

शोपियाँमध्येही दहशतवाद्याला कंठस्नान
दरम्यान, जम्मू आणि काश्मिरमधील शोपियाँ जिल्ह्यात बुधवारी रात्री सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनंतर दलांनी केशवा या गावात वेढा घालून कारवाई केली. नुकताच सक्रिय झालेला हा दहशतवादी याआधी भूमिगत राहून काम करत होता. त्याचप्रमाणे, तो अमली पदार्थ तस्करीतही सहभागी होता. त्याने केलेल्या गोळीबारात एक नागरिक गंभीर जखमी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील व्हा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT