पाकिस्तानच्या या कुरापती रोखत भारतीय जवानांनी (Indian Army) 16 आणि 24 जून रोजी PoK मध्ये दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 15 PAFF दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
जम्मू-काश्मीर : पाकिस्तानी लष्कर (Pakistan Army) भारतात घुसखोरी, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी नवनवीन हालचाली करत आहे. त्यांनी पीओकेमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांना घुसखोरी करण्यासाठी आमिष दाखवलंय.
मात्र, यात त्यांना अपयश आल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानी लष्कर त्या लोकांना मारत आहे. या घटनांनंतर नागरिकांनी पाकिस्तानी लष्कराचा निषेध करण्यास सुरुवात केलीये.
दरम्यान, पाकिस्तानच्या या कुरापती रोखत भारतीय जवानांनी (Indian Army) 16 आणि 24 जून रोजी PoK मध्ये दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 15 PAFF दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे.
आदिल मजीद लोन असं या दहशतवाद्याचं नाव आहे. चकमकीदरम्यान या दहशतवाद्यानं एक व्हिडिओ बनवला आणि तो अल-अक्सा मीडिया जम्मू काश्मीर नावाच्या टेलिग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये दहशतवादी मजीदनं आपण अल-बद्र संघटनेशी संबंधित असल्याचं सांगितलंय.
याबरोबरच जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांत 11 दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून 55 किलो ड्रग्ज आणि 12 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एजन्सींनी पुरवलेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे वाढीव दक्षतेमुळे सुरक्षा दलांना जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीचे तीन मोठे प्रयत्न अयशस्वी करण्यात मदत झाली. यामध्ये 11 ते 15 दहशतवादी मारले गेले आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.