bofors 
देश

चीन विरोधात 'हैं तयार हम', बोफोर्स, M-777, L-70 अरुणाचलमध्ये सज्ज

चीनची अरुणाचल मधल्या तवांगवर नजर आहे. चीन तवांगला दक्षिण तिबेटचा भाग समजतो.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: लडाख (Ladakh) पाठोपाठ चीनने (china) आता अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal pradesh) सीमेवर कुरापती सुरु केल्या आहेत. चीनच्या कुठल्याही दादागिरीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करही (Indian army) पूर्णपणे सज्ज आहे. उंचावरील या युद्ध क्षेत्रात भारताचा तोफखाना, एअर डिफेन्स गन्स, सैन्य तुकड्या तैनात आहेत. इथे तापमान मायनस म्हणजे उणे ३ ते ५ अंश सेल्सिअस आहे. भारताची ३,४८८ किलोमीटरची सीमारेषा चीनला लागून आहे.

चीनची अरुणाचल मधल्या तवांगवर नजर आहे. चीन तवांगला दक्षिण तिबेटचा भाग समजतो. अरुणालच मध्ये मोक्याच्या ठिकाणांवर भारतीय सैन्य तैनात आहे. अत्याधुनिक रडार तसेच दिवस-रात्र टेहळणी सुरु आहे. चीनने कुठली आक्रमकता दाखवलीच तर प्रत्युत्तर देण्यासाठी १०५ एमएम फिल्ड गन, १५५ एमएम बोफोर्स, M-777 अल्ट्रा लाइट हॉवित्झर तैनात आहेत.

सुधारीत L-70 एअर डिफेन्स गनही शत्रूचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे. भारताने तवांगमधल्या फॉरवर्ड भागांमध्ये ही सर्व शस्त्र सज्जता ठेवली आहे. L-70 एअर डिफेन्स गनची रेंज ३.५ किलोमीटर आहे. पण भविष्यात ड्रोन स्वॅर्म विरोधात ही गन परिणामकारक ठरु शकते.

बोफोर्स, M-777 अल्ट्रा लाइट हॉवित्झरची लांब पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. बोफोर्स २४ ते ३० कमी तर M-777 ३० ते ३५ किमीपर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करु शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT