गुजरात निवडणुकीत क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाही रिंगणात आहे.
Gujarat Election News : गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची (Cricketer Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा जडेजाही (Rivaba Jadeja) रिंगणात आहे.
रिवाबा ह्या जामनगर उत्तरमधून भाजपच्या उमेदवार आहेत. या दोन्ही दिग्गजांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा आणि त्यांची बहीण नयना जडेजा यांनीही जडेजा कुटुंबाकडून मतदान केलं. मतदान केल्यानंतर रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध जडेजा यांनी आपण काँग्रेससोबत (Congress) असल्याचं सांगितलं.
एएनआयशी बोलताना अनिरुद्ध जडेजा (Anirudh Singh Jadeja) म्हणाले, "मी काँग्रेस पक्षासोबत आहे. पक्षाची बाब कुटुंबाच्या बाबीपेक्षा खूप वेगळी आहे. आपण आपल्या पक्षाला चिकटून राहिलं पाहिजे. आम्ही काँग्रेससोबत दीर्घकाळापासून जोडलेले आहोत. त्यामुळं आमच्या कुटुंबात कोणतीही अडचण नाही."
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रवींद्र जडेजाची बहीण नयना जडेजा म्हणाली, "हे पहिल्यांदाच घडत नाहीये. जामनगरमध्ये अनेक कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांसाठी काम करत आहेत. व्यक्तीनं आपल्या विचारधारेवर समाधानी असलं पाहिजे आणि त्याच्या पद्धतीनं 100 टक्के काम केलं पाहिजे. जो चांगला असेल तो नक्कीच जिंकेल. निवडणुका आणि राजकारणामुळं माझं भावावरचं प्रेम कमी होणार नाहीये. माझी वहिनी आता भाजपची उमेदवार आहे. परंतु, वहिनी म्हणून ती खूप चांगली आहे."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.