Justin Trudeau 
देश

Justin Trudeau : जी २० परिषदेदरम्यान ट्रूडोंच्या विमानात सापडलं कोकेन! माजी राजनैतिक अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

रोहित कणसे

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्याप्रकरणात भारतावर केलेल्या गंभीर आरोपानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. यादरम्यान एक निवृत्त भारतीय माजी राजनैतिक अधिकारी दीपक वोहरा यांनी ट्रुडो यांच्या G20 शिखर परिषदेनिमीत्त झालेल्या भारत भेटीबद्दल विचित्र दावा केला आहे.

जी२० परिषदेदरम्यान पंतप्रधान ट्रुडोंच्या विमानात कोकेन सापडले होते आणि कॅनडाचे पंतप्रधान हे दोन दिवस त्यांच्या खोलीतून बाहेर आले नाहीत, असा दावा वोहरा यांनी केला आहे. दरम्यान या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलातना वोहरा यांनी दावा केला की, अशी अफवा आहेत की, ट्रूडोंच्या विमानात स्निफर कुत्र्यांना कोकेन सापडले आणि ट्रूडो दोन दिवस त्यांच्या खोलीतून बाहेर पडले नाहीत. भारताच्या राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमाला देखील ते गेले नाहीत. लोक सांगत आहेत की, ट्रू़डो ड्रग्जच्या नशेत होते, त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय आहे ते सांगता येत नाही असेही वोहरा म्हणाले.

इतकेच नाही तर वोहरा यांनी ट्रूडो हे घाबरल्यासारखे दिसत होते आणि स्वतःला कॅनेडियन रॅम्बो म्हणूव चित्रीत करण्याचा प्रयत्न करत होते असेही वोहरा म्हणाले. दरम्यान दीपक वोहरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ टीव्ही डिबेट शो दरम्यानचा आहे.

महत्वाची बाब म्हणजे दीपक वोहरा यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांनी टीव्ही चॅनलवर चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांना पिंग पाँग टिंग लिंग टिंग लिंग म्हटले होते. याशिवाय 2007 ते 2009 पर्यंत सूदान मध्ये राजदूत म्हणून त्यांच्या कार्यकाळा दरम्यान आर्थिक घोटाळ्यासंबंधीत प्रकरणात त्यांची सीबीआयकडून चौकशी देखील सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जी२० शिखर परिषदेत जगभरातील अनेक देशांचे नेते एकत्र आले होते. मात्र या डिनर पार्टीसाठी पीएम जस्टिन ट्रूडो उपस्थित राहिले नव्हते.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे सध्या चर्चेत आहेत. कारण त्यांनी कुठलाही पुरावा न देता खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून भारतावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर भारताने देखील त्याच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT