Chinese Linked Apps Ban  esakal
देश

Chinese Apps Ban : चीनविरुध्द मोदी सरकारची पुन्हा मोठी कारवाई; 232 अॅप्सवर घालणार बंदी!

भारत सरकारनं (India Government) चीनविरोधात मोठी कारवाई केलीये.

सकाळ डिजिटल टीम

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या अ‍ॅप्सना ब्लॉक करण्याचे निर्देश या आठवड्यात मिळाले आहेत.

Chinese Linked Apps Ban : भारत सरकारनं (India Government) चीनविरोधात मोठी कारवाई केलीये. कर्ज आणि सट्टेबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या चीनशी संबंधित अनेक अॅप्सवर सरकारनं बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केलीये.

वृत्तानुसार, मोदी सरकारनं (Modi Government) गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार ही कारवाई सुरू केलीये. सरकार 138 सट्टेबाजी आणि 94 लोन अॅप्सवर तात्काळ आणि आपत्कालीन आधारावर बंदी घालणार आहे. या अॅप्समध्ये भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला हानी पोहोचवणाऱ्या सामग्रीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सूत्रांनी सांगितलं की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या अ‍ॅप्सना ब्लॉक करण्याचे निर्देश या आठवड्यात मिळाले आहेत. MeitY नं हे अ‍ॅप्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं 6 महिन्यांपूर्वी चिनी कर्ज देणाऱ्या 28 अ‍ॅप्सची चौकशी सुरू केली होती. तपासात असं आढळून आलं की, असे 94 अ‍ॅप्स ई-स्टोअरवर आहेत आणि इतर कोणत्याही थर्ड पार्टी लिंकद्वारे काम करत आहेत. लोकांना मोठ्या प्रमाणावर कर्जात अडकवण्यासाठी अनेकदा सापळे लावणाऱ्या या अ‍ॅप्सचा हेरगिरी आणि प्रचाराची साधने म्हणूनही गैरवापर केला जाऊ शकतो.

अ‍ॅप्समध्ये भारतीयांचा महत्त्वाचा डेटा

याशिवाय, भारतीय नागरिकांच्या डेटाची सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. सूत्रांनी सांगितलं की, तेलंगणा, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला या अ‍ॅप्सवर कारवाई करण्यास सांगितलं होतं. या अ‍ॅप्सना हेरगिरी साधनांमध्ये बदलण्यासाठी सर्व्हर-साइड सुरक्षेचा गैरवापर करण्याची क्षमता असल्याचंही तपासकर्त्यांना आढळून आलं आहे. कारण, या अ‍ॅप्समध्ये भारतीयांचा महत्त्वाचा डेटा आहे. अशा डेटाचा वापर मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.

कर्जदारांना त्रास देण्यास सुरुवात

जवळपास सर्व बंदी असलेले अ‍ॅप्स चिनी नागरिकांनी तयार केले होते. ज्यांनी भारतीयांना कामावर ठेवलं आणि त्यांना काम सोपवलं. लोकांना कर्ज घेण्यास प्रलोभन दिल्यानंतर त्यांनी वार्षिक व्याज 3,000 टक्क्यांपर्यंत वाढवलं. कर्जदार संपूर्ण कर्जाची परतफेड करू शकत नसताना या अ‍ॅप्सच्या लोकांनी कर्जदारांना त्रास देण्यास सुरुवात केली.

कर्जदारांना पाठवले अश्लील संदेश

कर्जदारांना या अ‍ॅप्सवरून अश्लील संदेश पाठवले गेले, त्यांचे मॉर्फ केलेले फोटो सोडण्याची धमकी दिली गेली आणि त्यांच्या काँटॅक्ट लिस्टला संदेश पाठवून त्यांची बदनामी केली. विशेषत: आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या अ‍ॅप्सच्या अनेक कर्जदारांच्या आत्महत्यांनंतर हा मुद्दा चर्चेत आला. हे अ‍ॅप्स भारतीयांना अडकवण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण करण्यासाठी पळवाटांचा फायदा घेत आहेत. आता हे अ‍ॅप्स 'इमर्जन्सी ब्लॉक' करण्याच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं कारवाई सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT