Cheetah Project India esakal
देश

Cheetahs : आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांचं झालं नामकरण; मोदींनी नागरिकांकडून मागवल्या होत्या सूचना

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना त्यांच्या नवीन घरात पाठवतानाच नवीन नावे देण्यात आली आहेत. 25 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात भाषणात चित्यांची नवीन नावे सुचविण्याचे आवाहन केल्यानंतर हे नामांतर करण्यात आले आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने गुरुवारी नवीन नावांची घोषणा केली.

नवीन नावे सुचवण्याची स्पर्धा भारत सरकारच्या mygov.in पोर्टलवर आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 11,565 सूचना प्राप्त झाल्या होत्या. तिबिलिसी, सिया, सवाना आणि ओबान या नामिबियन चित्ताची आता धात्री, ज्वाला, नाभा आणि पवन अशी नावे ठेवण्यात आली आहेत.

दक्षिण आफ्रिकन चित्त्यांना पूर्वी त्यांच्या निवासस्थानावरून नावे देण्यात आली होती - जसे की मपेसु (sub-adult female), फिंडा (adult male1), त्वालु (adult female), वाटरबर्ग (biosphere adult female।). त्यांच्यासाठी निवडलेली नवीन नावे आता दक्षा, निर्वा, वायु, अग्नि, गामिनी, तेजस, वीरा, सूरज, धीरा, उदय, प्रभास आणि पावक, अशी आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, चित्तांचे नाव बदलणे हे या प्रकल्पाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या आणि लोकांना संवेदनशील करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. सर्व 12 दक्षिण आफ्रिकेतील चित्ते आता मोठ्या आवारात सोडण्यात आले आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक जे.एस.चौहान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या (डीएएचडी) मंजुरीनंतर बारा चित्त्यांना मोठ्या बंदिस्तात परिसरात सोडण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT