Indian Attire sakal
देश

Indian Attire : पदवीप्रदान सोहळ्यासाठी आता भारतीय पोशाख ; शैक्षणिक संस्थांना मंत्रालयाची सूचना

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता पदवी स्वीकारताना आता वसाहतवादी काळातील काळा झगा आणि काळी टोपी या युरोपीय पोशाखाऐवजी भारतीय संस्कृतीला साजेशा पोषाखाची निवड करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता पदवी स्वीकारताना आता वसाहतवादी काळातील काळा झगा आणि काळी टोपी या युरोपीय पोशाखाऐवजी भारतीय संस्कृतीला साजेशा पोषाखाची निवड करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केली आहे. आरोग्य मंत्रालयाने देशातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि इन्स्टिट्यूट आॅफ नॅशनल इंपाॅर्टन्स या संस्थांना पदवीप्रदान समारंभावेळी विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक पोशाख निश्चित करण्याचे आदेश, एका पत्राद्वारे दिले आहेत.

‘‘ब्रिटिशांच्या काळात पदवीप्रदान समारंभात काळा झगा आणि टोपी घालण्याची पद्धत सुरू झाली. वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक असलेली ही युरोपीय पद्धत आता बदलण्याची आवश्यकता आहे,’’ असे आरोग्य मंत्रालयाने या पत्रात म्हटले आहे.

आरोग्यमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व संस्थांना पोशाखाबाबत सूचना करण्यात आली असून, संबंधित संस्था ज्या राज्यांत आहेत तेथील पारंपरिक पेहेरावाला आणि भारतीय संस्कृतीला अनुरूप असा पदवीप्रदान सोहळ्यासाठी नवा पोशाख निश्चित करावा, असे आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. संबंधित पोशाख निश्चित झाल्यानंतर तो मान्यतेसाठी आरोग्यमंत्रालयाकडे पाठविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे.

स्थानिकांची मदत घ्या

पदवीप्रदान सोहळ्यासाठी भारतीय संस्कृतीला आणि संबंधित राज्यातील संस्कृतीला साजेसा पोशाख तयार करण्यासाठी स्थानिक कलाकारांची मदत घ्यावी, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हा पोशाख विद्यार्थ्यांना सहज परिधान करता येणारा असावा असेही या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT