DGCA Rule Sakal
देश

DGCA Rule: भारतीय वैमानिकांना परफ्यूम वापरण्यावर येणार बंदी? काय आहे कारण

DGCA Rule: जगभरातील विमान कंपन्या इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या नियमांचे पालन करतात

राहुल शेळके

DGCA Rule: बरेच लोक दररोज परफ्यूम आणि डिओडोरंट वापरतात. यामुळे शरीराची दुर्गंधी तर दूर होतेच पण मूडही फ्रेश राहतो. परफ्यूमच्या वासाने आपला आत्मविश्वासही वाढतो. परफ्यूम किंवा डिओडोरंट थेट त्वचेवर लावल्याने काहीवेळा दुष्परिणाम होऊ शकतात.

त्यामुळे कपड्यांवर लावणे हा उत्तम पर्याय आहे. परफ्यूम आणि डिओडोरंटचे फायदे असूनही ते विमानात नेण्यावर बंदी आहे. जगभरातील विमान कंपन्या इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या नियमांचे पालन करतात, ज्या अंतर्गत केबिनमध्ये परफ्यूम किंवा डिओडोरंट आणण्यास बंदी आहे.

डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) लवकरच वैमानिकांना परफ्यूम वापरण्यास बंदी घालू शकते. कारण त्यात अल्कोहोलयुक्त पदार्थ असतात. तसेच अल्कोहोल चाचणी सकारात्मक दाखवू शकते.

विमान वाहतूक नियामकाने सुरक्षा नियमांसंदर्भात, विमान नियम, 1937 च्या तरतुदींनुसार जारी केलेल्या Civil Aviation Regulations (CARs) मध्ये सुधारणा करण्यासाठी सुचना मागवल्या आहेत.

विमान नियमानुसार, कोणत्याही वैमानिकाने/सदस्याने कोणतेही औषध/फॉर्म्युलेशनचे सेवन करू नये किंवा माउथवॉश/टूथ जेल/परफ्यूम किंवा अशा कोणत्याही उत्पादनाचा वापर करू नये ज्यामध्ये अल्कोहोलयुक्त पदार्थ असतील.

यामुळे अल्कोहोल चाचणी सकारात्मक दाखवू शकते. अशी औषधे घेत असलेल्या कोणत्याही सदस्याने फ्लाईंग असाइनमेंट घेण्यापूर्वी कंपनीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अनेक विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की वैमानिक/सदस्य/ प्रवासी त्यांच्या सामानात किंवा चेक-इन बॅगेजमध्ये परफ्यूम ठेवू शकत नाहीत. विमानात परफ्यूम किंवा डिओडोरंट न घेण्यामागे अनेक कारणे आहेत.

परफ्यूम, डिओडोरंट्स किंवा सुगंधांमध्ये अल्कोहोल असते, जे ज्वलनशील असते. आग लागल्यास, ते आग आणखी भडकवू शकते आणि ती विझवणे अधिक कठीण बनवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT