Indian Railway 
देश

भारतीय रेल्वे होणार अधिक सुरक्षित, 4G स्पेक्ट्रमला केंद्राची मंजुरी

आजवर रेल्वेमध्ये 2G स्पेक्ट्रमचा वापर केला जात होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : रेल्वे वाहतूक (Rail Traffic) अधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वेला 4G स्पेक्ट्रमचं अधिक वाटप करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. आजवर रेल्वे 2G स्पेक्ट्रमचा उपयोग करुन आपलं काम करत होती. इतकचं नव्हे ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शनची व्यवस्था आता अधिक सुरक्षित बनवली जात आहे. दोन गाड्यांची टक्कर होऊ नये यासाठी जी व्यवस्था तयार केली आहे. ती चार भारतीय कंपन्यांनी मिळून बनवली आहे. या स्पेक्ट्रमचे शुल्क, दूरसंदेशवहन विभागाने आखून दिलेल्या सूत्रानुसार व परवाना शुल्कासंबंधीच्या ट्रायच्या शिफारशींनुसार लागू होणार आहे. (Indian Railways to be safer 4G spectrum approved by Center)

त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या प्रवास आणि सिग्नल प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ७०० मेगाहर्ट्झच्या बँडमध्ये ५ मेगाहर्ट्झचा स्पेक्ट्रम देण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर भारतीय रेल्वे आपल्या मार्गांवर धावत्या गाड्यांसाठी रेडिओ तरंगांच्या मदतीने संदेशवहन करू शकणार आहे. या प्रकल्पासाठी २५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची गरज भासेल असा अंदाज आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वेगाड्यांची धडक टाळणारी यंत्रणेला मंजुरी

याबरोबरच, भारतीय रेल्वेने गाड्यांच्या सुरक्षेसाठी देशांतर्गत विकसित झालेली स्वयंचलित प्रणाली TCAS अर्थात रेल्वेगाड्यांची धडक टाळणारी यंत्रणा स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. या यंत्रणेद्वारे गाड्यांची धडक टाळता येणार असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास व प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या प्रचालन आणि देखभाल व्यवस्थेत या प्रणालीमुळे मोठा बदल होणार आहे. सुरक्षाव्यवस्थेत वाढ होण्याबरोबर, उपलब्ध पायाभूत सुविधांमध्येच मार्गावर अधिक गाड्या चालविणे शक्य होणार आहे. आधुनिक रेल्वेजाळे तयार होण्याने वाहतूक खर्चात कपात आणि कार्यक्षमतेत वाढ शक्य होणार आहे, असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.

रेल्वे डबे आणि इंजिनवर इंटरनेटच्या मदतीनं ठेवता येणार लक्ष

या प्रणालीमुळं रेल्वेला सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने ध्वनी, ध्वनिचित्र आणि माहितीचे संदेशवहन करता येणे शक्य होणार आहे. तसेच प्रचालन, सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकणार आहे. आधुनिक सिग्नलयंत्रणा आणि गाड्यांच्या संरक्षण यंत्रणेसाठी त्याचा उपयोग होईल. तसेच लोको पायलट म्हणजे चालक आणि गार्ड म्हणजे मार्गरक्षक यांच्यादरम्यान विनाअडथळा संदेशवहन सेवाही यामुळे मिळू शकेल. तसेच, रेल्वेगाड्यांची कामे अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि अधिक वेगवान पद्धतीने होण्यासाठी डबे, वाघिणी, इंजिनं यांच्यावर इंटरनेटच्या मदतीने दूरवरून देखरेख करणे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहणेही या प्रणालीमुळे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT